शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, ‘सुटाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:06 IST

बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली. विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा १५ दिवस पुढे ढकला‘सुटा’ची मागणी; प्राध्यापकांचा विद्यापीठावर मोर्चा

कोल्हापूर : बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली. विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर धडक मोर्चा काढला.विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्सच्या (एम्फुक्टो) नेतृत्वाखाली राज्यभरातील प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला चौदा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री आणि उच्चशिक्षणमंत्री अद्यापही आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा निषेध करीत मंगळवारी सुटाच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढला.

सकाळी साडेअकरा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहापासून मोर्चाला सुरूवात झाली. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन, डोक्यावर गांधी टोपी परिधान करून प्राध्यापक या मोर्चात सहभागी झाले.

‘उच्च शिक्षणाची गुणवत्ता, स्वायत्तता मोडीत काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत मौन बाळगणाऱ्या शिक्षणमंत्र्यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरProfessorप्राध्यापक