शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जादा व्याजाच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 10:45 IST

हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. दीड वर्षापासून मात्र कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली आणि आता गाशा गुंडाळल्याने अध्यक्ष बंडोपंत कुंडलिक पाटील (म्हाकवेकर) यांच्यासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ताराराणी महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देजादा व्याजाच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक‘कागल’ तालुक्यातील संस्था : कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडविरोधात तक्रार

कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. दीड वर्षापासून मात्र कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली आणि आता गाशा गुंडाळल्याने अध्यक्ष बंडोपंत कुंडलिक पाटील (म्हाकवेकर) यांच्यासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ताराराणी महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेड ही कंपनी २०११ साली राजारामपुरी व हमीदवाडा येथे सुरू झाली. ५०० हून अधिक एजंटांमार्फत सर्वसामान्यांना शेळीपालन, दुग्ध तसेच अन्य व्यवसाय उभे करून, आर्थिक फायदा व रोजगाराचे आमिष दाखवून तिने गुंतवणूक करायला भाग पाडले. पुनरावर्ती ठेव, मुदतबंद ठेव अशा विविध योजनांतून १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत १५ हजार नागरिकांनी यात गुंतवणूक केली. केवळ कोल्हापुरातून सात हजार नागरिकांनी पाच कोटींच्या आसपास या कंपनीत गुंतवणूक केली आहे.गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही नागरिकांकडून गुंतवणूक करून घेण्यात आली. पैसे व्याजासह परत करण्याची वेळ आली तेव्हा टाळाटाळ सुरू झाली. एजंटांना दिलेले धनादेश वटले नाहीत. कंपनीचे कार्यालय आणि संचालकांचे फोनही बंद आहेत. दाद मागण्यासाठी घरावर मोर्चा नेला तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी बंगलोर येथील न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र या आदेशालाही दाद देण्यात आलेली नाही.

त्यामुळे कंपनीची चौकशी व्हावी, अध्यक्ष बंडोपंत पाटील (म्हाकवेकर), म्होरके संचालकांची तसेच सदस्यांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ताराराणी महिला आघाडीने केली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्षा श्रद्धा महागांवकर, अश्विनी खोत, सूर्यकांत डवरी, नंदकुमार डवरी, सुवर्णा शिंदे, दीपाली मंडले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

बंडोपंत पाटील हे बाजार समितीचे दहा वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर गोकुळ व बिद्री कारखान्याचेही संचालक म्हणून त्यांनी काम केले. सुरुवातीला ते बालाजी ड्रॉ काढत होते. त्यामाध्यमातून लोकांना बक्षीसे द्यायचे. त्यातून विश्र्वास निर्माण झाल्यावर कृषीबंध संस्था स्थापण करून त्यांनी पैसे गोळा केले व ही गुंतवणूक प्लॉटमध्ये करणार असून तुम्हांला चारदोन वर्षात लगेच पैसे परत करणार असे आश्वासन ते त्यावेळी देत होते. त्यास भुलून लोकांनी गुंतवणूक केली व आता ती बुडाल्यावर आमची फसवणूक झाली म्हणून त्यांच्या घरावर मोर्चे काढू लागले आहेत.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीWomenमहिलाkolhapurकोल्हापूर