शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉलसाठीच्या ११४ प्रकल्पांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 23:49 IST

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला साखर उद्योगाने चांगला प्रतिसाद दिला आहे. इथेनॉलच्या विद्यमान प्रकल्पांची क्षमता वाढविणे, आधुनिकीकरण आणि नवीन प्रकल्प यासाठीच्या सहा हजार १३९ कोटींच्या ११४ प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या कर्जावरील सहा टक्के व्याज केंद्र सरकार ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला साखर उद्योगाने चांगला प्रतिसाद दिला आहे. इथेनॉलच्या विद्यमान प्रकल्पांची क्षमता वाढविणे, आधुनिकीकरण आणि नवीन प्रकल्प यासाठीच्या सहा हजार १३९ कोटींच्या ११४ प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या कर्जावरील सहा टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. यात महाराष्ट्रातील ५३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.इथेनॉल प्रकल्पाचे प्रदूषण शून्य टक्क्यावर आणण्यासाठी अत्याधुनिक इन्सिनेरेशन बॉयलर उभारणी, डिस्टिलरीजची क्षमता वाढविणे आणि नवीन डिस्टिलरीजचे हे प्रस्ताव आहेत. सध्या देशाची इथेनॉल उत्पादनाची क्षमता सुमारे २.७५ अब्ज लिटर आहे. पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही क्षमता ३.२५ अब्ज लिटरपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देताना यासाठीच्या प्रकल्पांना कर्जावर व्याज अनुदान देऊ केले आहे. त्याचप्रमाणे इथेनॉलच्या दरातही गेल्या महिन्यात भरीव वाढ केली आहे. उसाच्या रसापासून किंवा बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केल्यास ६०० लिटर इथेनॉल म्हणजे १ टन साखर, असे प्रमाण सरकारने निश्चित केले आहे. हे प्रमाण साखरेचा उतारा ठरविण्यासाठी उपयोगी पडणार आहे.मंजूर प्रस्तावांमध्ये अत्याधुनिक बॉयलर उभारणीचे २६ प्रस्ताव आहेत. तर सध्या असलेल्या डिस्टिलरीजची क्षमता वाढवण्यासाठीचे २७ प्रस्ताव आहेत. उर्वरित ६१ प्रस्ताव नव्या प्रकल्पांचे आहेत. येत्या दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास देशाच्या इथेनॉल निर्मितीक्षमतेत मोठी वाढ होणार आहे.महाराष्ट्रातील ५३ प्रकल्पांत साताऱ्यातील चार कारखानेकेंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने मंजूर केलेल्या ११४ प्रस्तावांमध्ये महाराष्ट्रातील ५३ प्रस्तावांचा समावेश आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीलकुंभी-कासारी, दत्त- शिरोळ, डी. वाय. पाटील, रिलायबल शुगर, शरद-नरंदे या कारखान्यांचा तर सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, मोहनराव शिंदे, उदगिरी,माणगंगा या कारखान्यांचा तर सातारा जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते रेठरे, जरंडेश्वर, बाळासाहेब देसाई, जयवंत शुगर या कारखान्यांचा समावेश आहे.