१०९६ कोरोनायुक्त, १०७२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:24+5:302021-05-21T04:26:24+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी असली तरी मृतांचा आकडा अजूनही खाली येत नाही. नव्याने १०९६ कोरोना ...

1096 coronary, 1072 coronal free | १०९६ कोरोनायुक्त, १०७२ कोरोनामुक्त

१०९६ कोरोनायुक्त, १०७२ कोरोनामुक्त

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी असली तरी मृतांचा आकडा अजूनही खाली येत नाही. नव्याने १०९६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे; तर १०७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोल्हापूर शहरापेक्षा करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या करवीर तालुक्यात २६२ नोंदवण्यात आली आहे; तर कोल्हापूर शहरातील २१८ नागरिकांना कोरोना झाला आहे. त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात १३१, तर शिरोळ तालुक्यात ८६ रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजीतही संख्या कमी आली असून ती ६९ इतकी आहे.

झालेल्या ४४ मृत्यूंपैकी केवळ एक मृत्यू सांगली जिल्ह्यातील असून उर्वरित ४३ मृत्यू पावलेले नागरिक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये सर्वाधिक १५ मृत्यू हे कोल्हापूर शहरातील आहेत.

चौकट

कोल्हापूर शहरातील १५ मृत्यू

कोल्हापूर १५

साळोखेनगर, नाना पाटीलनगर, शिवाजी पेठ, कसबा बावडा, टेंबलाईवाडी, साने गुरुजी वसाहत, सोमवार पेठ, जागृतीनगर, चिलेनगर, शिवाजी उद्यमनगर, स्टेट बँक कॉलनी, लाईन बझार, कदमवाडी, रंकाळा, फुलेवाडी

करवीर ०८

गडमुडशिंगी, बाचणी, उचगाव २, म्हारूळ, वळिवडे, नंदगाव, शिंगणापूर

हातकणंगले ०६

चंदूर, किणी, कोरोची, पेठवडगाव, पट्टणकोडोली, भेंडवडे

इचलकरंजी ०५

इचलकरंजी २, सांगली नाका, यशवंत कॉलनी, गणेशनगर

शिरोळ ०३

शिरोळ, चिप्री, उदगाव

गडहिंग्लज ०३

खमलेट्टी, अरळगुंडी, गडहिंग्लज

शाहूवाडी ०१

सरुड

भुदरगड ०१

राणेवाडी

पन्हाळा ०१

माले

इतर ०१

बानेवाडी वाळवा, जि. सांगली

Web Title: 1096 coronary, 1072 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.