शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

एकरी १०५ टन उसाचे उत्पादन

By admin | Updated: February 3, 2015 00:27 IST

शिरढोणमधील शेतकऱ्याचे कौशल्य : योग्य नियोजन, आंतरपिकातून निघाला खर्च

कमी कष्ट, योग्यवेळी होणारे पाण्याचे नियोजन, खतांची मात्रा, कारखान्याकडून उसाला मिळणारा प्रतिटन दर, आदी बाबींचा विचार करता पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी ऊसपिकाकडेच अधिक झुकला. परिणामी, पट्ट्यात उसांचे उत्पादन वाढले, तर साखर कारखान्यांचीही संख्या मुबलक आहे. पण खर्च कमी करून योग्य नियोजन केल्यास उसाचेही उत्पादन वाढविता येते, हे शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकरी आण्णा बाबू मुंगळे आणि त्यांचा मुलगा बाबूराव मुंगळे यांनी दाखवून दिले आहे. एकरातून त्यांनी १०५ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले. विशेष म्हणजे पाटपाण्यावर त्यांनी विक्रमी उत्पादनाची किमया साधली आहे. मशागतीपासून ऊस तोडणीपर्यंत त्यांना एकरासाठी ५० हजारांचा उत्पादन खर्च आला. उसात त्यांनी कोथिंबिरीचे आंतरपीक घेऊन त्यापासून १८ हजारांचे उत्पादन घेतले. त्यामुळे एकरात एकूण अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.मुंगळे यांनी १६ जुलै २०१३ रोजी ६० गुंठे क्षेत्रात पाच फूट सरीमध्ये दोन फूट अंतरावर ‘को-०२६५’ वाणाच्या उसाची लागवाड रोपपद्धतीने केली. पट्ट्यामध्ये कोथिंबीर लागवडही केली. रोप लागणीनंतर शुगर -१००, ड्रीपची एकरी पाच लिटरप्रमाणे आळवणी केली व दीड महिन्यानंतर २० दिवसांच्या अंतराने पाचवेळा अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, ओझोन, जी. ए. सिक्वेल पोषक फवारण्याने फुटवे जोमदारपणे वाढले व ऊसही पोसला. पाण्याचे व्यवस्थापन करीत त्यांनी वापसा स्थिती राहील, याची काळजी घेतली. त्यामुळे ठिबक सिंचनाशिवायही उसाच्या एकरात १०० टनावर उत्पादन मिळू शकतो हे दाखवून दिले. खत व्यवस्थापनाकडेही काळजीपूर्वक लक्ष देताना बाळ भरणी, मुख्य भरणी व मे अखेरीस शेवटचा डोसचे नियोजन केले. एन. पी. के. सरोवर मॅग्नेशियम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रवे, झिंक, सिलकॉन, निर्मल सीडसचे बायोपॉवर ४० किलो, बोरॉन, गंधकाचाही वापर केल्याने उत्पादन मिळाले. दोन फुटाला रोपामुळे एकरी ४० हजार उसांची संख्याही राखता आली. एका उसाचे सरासरी वजन तीन किलोपर्यंत भरले. शिरोळ दत्त कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, पोपट चव्हाण, सुभाष देसाई, कृषी अधिकारी एस. बी. देशमुख, राजेश शहापुरे, विजय देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले.- गणपती कोळी ल्ल कुरुंदवाड