शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाने रंकाळ्यात १०० वर्षांचे कासव मृत : दुर्मीळ इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:57 IST

आदित्य वेल्हाळ।कोल्हापूर : रंकाळ्यात राहणारा व तलावाच्या जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेला इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल (मऊ पाठीचा कासव) हा रंकाळ्यातील प्रदूषणाचा बळी ठरला. त्याचे वजन सुमारे ९० किलो होते. त्याचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. जंगली वाघाइतकेच संरक्षित असणारे हे मऊ पाठीचे गोड्या पाण्यातील कासव सोमवारी रंकाळ्यात मृतावस्थेत आढळून ...

ठळक मुद्देवाघाइतकेच संरक्षित असणारे; मऊ पाठ हे वैशिष्ट्य

आदित्य वेल्हाळ।कोल्हापूर : रंकाळ्यात राहणारा व तलावाच्या जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेला इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल (मऊ पाठीचा कासव) हा रंकाळ्यातील प्रदूषणाचा बळी ठरला. त्याचे वजन सुमारे ९० किलो होते. त्याचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. जंगली वाघाइतकेच संरक्षित असणारे हे मऊ पाठीचे गोड्या पाण्यातील कासव सोमवारी रंकाळ्यात मृतावस्थेत आढळून आले.

सोमवारी दुपारी रंकाळा तलावात पद्माराजे उद्यानासमोर दोन तरुणांना कासव तरंगताना दिसले. याबाबतची माहिती तरुणांनी ‘लोकमत’ला दिली. या कासवाला रंकाळा बचाव समितीचे शाहीर राजू राऊत, अमर जाधव, राजू पाटील यांनी पाण्यातून बाहेर काढले. त्याची लांबी साडेचार फूट होती व त्याच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती. ते प्रदूषित पाण्यामुळे मृत झाले आहे, अशी शक्यता यावेळी पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.

कासवासारखा उभयचर प्राणी मृत होत असेल, तर रंकाळा तलावातील जैवविविधता संपत आल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे काही दिवसांत जैवविविधतेत मृत पाण्याचा साठा म्हणून रंकाळा तलावाला घोषित करावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापूरची ओळख असणारा रंकाळा तलाव हा पूर्वीपासूनच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. चित्रपटांतून, चित्रकारांच्या कुंचल्यातून त्याची नैसर्गिक विविधता जितकी आकर्षित करते, त्याहूनही जैवविविधतेने तो समृद्ध आहे. स्थलांतरित पक्षी, उदमांजर, कीटक, सरपटणारे प्राणी, मासे या सर्वांसाठी आश्रयस्थान हा तलाव आहे.; पण गेल्या काही वर्षांत या तलावाचे प्रदूषण होत आहे. त्याची किंमत रंकाळ्यातील जलचरांना व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना मोजावी लागत आहे. 

इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल कासव वाघाइतकेच संरक्षित आहे. या जातीची अनेक कासव या तलावात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रंकाळा तलाव संरक्षित घोषित करावा.- प्रा. डॉ. जय सामंत, पर्यावरण तज्ज्ञ