शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

साखळी उपोषणाला १०० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 23:18 IST

सर्किट बेंच लढा : प्रधान सचिवांना पत्र

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सहा जिल्ह्यांचे सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी न्यायसंकुल इमारतीजवळ सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शुक्रवारी १०० दिवस पूर्ण झाले. दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी जिल्ह्यातील शिवसेना-भाजप आमदारांनी महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिवांना पत्र दिले आहे. शासनाने यावर तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्राद्वारे या लोकप्रतिनिधींनी केली आहे.एक डिसेंबर २०१६ पासून याप्रश्नी साखळी उपोषण सुरू आहे. सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनसह विविध संघटना, संस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. शुक्रवारी दगडी चाळ रूम नंबर तीनमधील वकिलांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. त्यामध्ये अ‍ॅड. अभिजित कापसे, अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. सचिन पाटील, अ‍ॅड. प्रशांत पाटील, अ‍ॅड. अरविंद मेहता, अ‍ॅड. मनीष देसाई, अ‍ॅड. वाय. आर. खोत, अ‍ॅड. मनोज पाटील, अ‍ॅड. नीलेश रणदिवे, अ‍ॅड. गुरुप्रसाद माळकर, अ‍ॅड. शरद पाटील, अ‍ॅड. निशांत वणकुद्रे, अ‍ॅड. आर. बी. मंडलिक, अ‍ॅड. सोमनाथ गुंजवटे, अ‍ॅड. विल्सन नाथन, अ‍ॅड. कुलदीप कोरगांवकर, अ‍ॅड. तेहजीज नदाफ, अ‍ॅड. शौकत गोरवाडे, अ‍ॅड. संदीप घाटगे, अ‍ॅड. उमेश माणगांवे, अ‍ॅड. के. डी. पवार, अ‍ॅड. भगवान पवार, अ‍ॅड. योजना पोळ, अ‍ॅड. युवराज जाधव, अ‍ॅड. प्रीतम सांबरे, अ‍ॅड. जावेद फुलवाले, अ‍ॅड. विक्रांत पाटील आदींचा सहभाग होता. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उपोषणाची सांगता झाली.लोकप्रतिनिधींचे पत्र...कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील तर भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक तसेच आमदार राजन साळवी यांनी पत्राद्वारे केली आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सुमारे ६२ हजार खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याप्रश्नी वकील व नागरिकांमध्ये शासनाबद्दल चिडीची भावना आहे. त्यामुळे यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, असे पत्रात म्हटले आहे.