शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री स्वनिधी योजनाअंतर्गत पदपथ विक्रेत्यांची १०० प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:15 IST

पदपथ विक्रेत्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. आतापर्यंत ५५२ पदपथ विक्रेत्यांनी अर्ज सादर केलेले असून १०० प्रकरणांना बँकेमार्फत मंजुरी मिळाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ठळक मुद्दे पदपथ विक्रेत्यांची १०० प्रकरणे मंजूरपी. एम. स्वनिधी योजनेत बँकांनी पुढाकार घ्यावा, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर : पदपथ विक्रेत्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. आतापर्यंत ५५२ पदपथ विक्रेत्यांनी अर्ज सादर केलेले असून १०० प्रकरणांना बँकेमार्फत मंजुरी मिळाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन काळात फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याकरिता केंद्र शासन पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनाअंतर्गत पदपथ विक्रेत्यांना दहा हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा करण्याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

या अनुषंगाने महानगरपालिकामार्फत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या संदर्भात आयुक्त कलशेट्टी यांनी शहरातील बँकांच्या जिल्हा समन्वयक यांची बैठक घेतली. याबाबत बँकांशी सकारात्मक चर्चा झाली. सर्व बँकांनी सदर योजना यशस्वी करण्यासाठी सहमती दर्शविली. पी. एम. स्वनिधी योजनेत महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये सध्या प्रथम स्थानी आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, सिडबीचे प्रतिनिधी व्ही. व्ही. प्रसाद, जिल्हा सहायक उपनिबंधक प्रदीप मालगावे, एनयूएलएमचे रोहित सोनुले, निवास कोळी, विजय तळेकर, स्वाती शहा, आदी उपस्थित होते

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर