शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:02 IST

परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक

ठळक मुद्देप्लास्टिक पिशव्या बंदीसाठी कठोर पाऊल

कºहाड : परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक पिशव्या जवळ बाळगताना आढळून आल्यास संबंधितास हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. या नियमांतर्गत पालिकेने आतापर्यंत अनेकांना दीडशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड केला आहे.

राज्य शासनाने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदीची घोषणा केली आणि त्या घोषणेची कठोर स्वरुपात अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका, जिल्हा परिषद अन् पंचायत समिती, ग्रामपंचायतींना दिले. त्यानुसार कºहाड पालिकेकडून या घोषणेची शहरात सध्या चांगलीच अंमलबजावणी केली जात आहे. रस्त्याने प्रवास करणारा प्रवासी, नागरिक अथवा दुकानदार उघड्यावर कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जात आहे. याबाबत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी थेट कारवाईच्या सूचना संबंधित पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

कºहाड पालिकेच्या वतीने शहरातील घरांमधील ओला व सुका कचरा रस्त्यावर न पडता तो थेट कचरा डेपात घनकचरा प्रक्रियेसाठी जावा, यासाठी बकेटचे वाटप केले आहे. तसेच सध्या शहरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यावर दिवसांतून दोनदा सफाई कर्मचाऱ्यांकडून पडलेला कचरा एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. तर नागरिकांसाठीही सूचनांचे फलकही रस्त्याकडेला लावलेले आहेत.कारवाईसाठी पथकाची नियुक्तीशहरात पालिकेतील प्रभागांसह वाढीव हद्दीत व सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व नाल्यांमध्ये कचरा टाकणाºयांवर तसेच उघड्यावर शौचालयास बसणाºयांवर थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी पालिकेतील एकूण नऊ मुकादम आणि त्यांच्या अंतर्गत अठरा कर्मचारी असे पथक तयार करण्यात आले आहे.ड्रेनेजचे पाणी सोडणाºयास दहा हजारांचा दंडकºहाड शहरात राहणाºया नागरिकांपैकी कोणी मैलामिश्रित ड्रेनेजचे सांडपाणी, मैला ड्रेनेज पाईप अथवा उघड्यावर सोडल्यास पालिकेकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या वतीने दहा हजार रुपये दंडही संबधितांस केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पालिकेच्या या नियमांमुळे मैला तसेच सांडपाणी उघड्यावर पडण्याचे प्रमाण कमी होणार, हे नक्की !प्लास्टिक पिशव्या वापरणाºयास शिक्षा...पहिला गुन्हा : ५ हजार रुपयेदुसरा गुन्हा : १० हजार रुपयेतिसरा गुन्हा : २५ हजार रुपये व तीन महिने कारावास

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिका