शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डेच्या ‘दत्त विकास’मध्ये ८८ लाखांचा अपहार -: पन्हाळा तालुक्यातही एंट्री टाकून १० लाखांची उचल केल्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:44 IST

कोल्हापूर : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दत्त विकास संस्थेत शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या कर्जाची ८८ लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेत जमा ...

ठळक मुद्देजिल्हा बॅँक निरीक्षक निलंबित

कोल्हापूर : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दत्त विकास संस्थेत शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या कर्जाची ८८ लाखांचीरक्कम जिल्हा बॅँकेत जमा न केल्याचे  प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये बॅँकेचे निरीक्षक व संस्थेच्या सचिवांना जबाबदार धरण्यात आले असून, निरीक्षक के. बी. पाटील यांना निलंबित केले आहे.आतापर्यंत यातील १८ लाख ३६ हजार रुपये वसूल झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी पन्हाळा शाखेंतर्गत निरीक्षक मुकेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नावावर आपणच पैसे उचल केले असून, त्यांच्याकडून १0 लाख रुपये वसूल केले आहेत. दत्त विकास संस्थेतून वर्षाला कोट्यवधी रुपयांचे पीक व मध्यम मुदत कर्जाचे वाटप केले जाते. पीक कर्ज शेतकºयांकडून वसूल करण्यात आले; पण ही रक्कम जिल्हा बॅँकेत भरलीच नाही. या शेतकºयांना पुन्हा कर्जपुरवठा करताना जिल्हा बॅँकेच्या निरीक्षकांनी रोखायला हवे होते.

चौकशीत ८८ लाखांची रक्कम अशी वाटप केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकाराला निरीक्षक के. बी. पाटील यांना जबाबदार धरीत निलंबित केले आहे. आतापर्यंत ८८ लाखांपैकी केवळ १८ लाख ३६ हजार रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी बॅँकेने तगादा लावला आहे. पन्हाळा शाखेचे निरीक्षक मुकेश पाटील यांनीही शेतकºयांच्या नावावर एंट्री टाकून १0 लाखांची उचल केल्याचे उघडकीस आले आहे. पाटील यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

‘दत्त’चे फेरलेखापरीक्षण होणारजिल्हा बॅँकेने झालेल्या प्रकाराबद्दल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली आहे. उपनिबंधक कार्यालय संबंधित संस्थेचे फेरलेखापरीक्षण करणार आहेत. त्यानंतरच या प्रकरणात नेमके कोण कोण दोषी आहेत, याचा उलघडा होणार आहे.कारवाई नसल्यानेच मुजोरीमध्यंतरी पन्हाळा तालुक्यातील एका बड्या नेत्याशी संबंधित निरीक्षकाने अपहार केला होता. त्याला केवळ एक दिवस निलंबित करून पुन्हा कामावर घेतले. जिल्हा बॅँकेकडून कडक कारवाई होत नसल्यानेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची मुजोरी वाढल्याची चर्चा बॅँकिंग वर्तुळात आहे. 

दत्त-सावर्र्डे शाखेत ८८ लाखांचा अपहार असून, त्यास निरीक्षक के. बी. पाटील, तर शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पैसे उचलणारे पन्हाळा शाखेचे निरीक्षक मुकेश पाटील यांना निलंबित केले आहे.- डॉ. ए. बी. माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी