शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथगतीने; केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 14:09 IST

Kalyan : कपिल पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांची पाहणी आज केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरु असल्याची बाब केंद्रीय मंत्री पाटील यांनी नमूद केली आहे. 

मागच्या महिन्यात पार पडलेल्या दिशा कमिटीच्या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्पांचा विषय मांडण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाविषयी विचारणा करीत ही कामे जलगगतीने व्हावी असा मुद्या उपस्थित केला होता. त्यावेळी प्रशासनाकडून कोविडमुळे प्रकल्पांना विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी सुरु असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते.

त्यानुसार आज पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी पश्चात  पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शंभर शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापलिकेची निवड करण्यात आली. 

या स्मार्ट सिटी प्रकल्पांकरीता केंद्र, राज्य आणि महापालिकेचा निधी खर्च होत आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील प्रकल्पांचे काम संथ गतीने सुरु असल्याचा मुद्दा पाटील यांनी अधोरेखीत करीत प्रकल्पांच्य कामांना गती द्या. नागरिकांच्या हिताची कामे जी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या डीपीआरमध्ये नव्हती. त्यांचाही समावेश करण्यात यावा अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनास केली आहे. काळा तलावाचे नाव भगवा तलाव झालेले नसून अद्याप काळा तलावच आहे असे विधान करीत पाटील यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

जितेंद्र आव्हाड यांची टीका ओबीसी समाजाचा अपमान करणारी - पाटीलजितेंद्र आव्हाड हे फार उच्च कोटीचे नेते आहे. ओबीसीवर भरोसा नही. ते कशासाठी भरोसा नाही हे मला माहिती नाही. ज्या मतदार संघातून ते निवडून येतात. त्याठिकाणचे ओबीसी त्यांना मदत करीत असली. त्यांना नेमके काय म्हणायचे होते हे माहिती नाही. त्यांचे वक्तव्य हे ओबीसी समाजाचा अपमान करणारे आहे. स्वत:ला सेक्यूलर समजणारे लोकं जेव्हा एका जातीच्या घटकाबद्दल वक्तव्य करतात. तेव्हा ते वक्तव्य निश्चितपणे निषेधार्थ आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली