- मुरलीधर भवारकल्याण - आज जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधून महापालिकेच्या आरोग्य, शिक्षण विभाग आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेतील नेतिवलीच्या प्रबोधन ठाकरे शाळेत मिशन रक्षा या अभिनव उपक्रमांतर्गत ९ ते १४ वयाेगटातील शालेयी विद्यार्थिंनीना गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात आली. पालकांचे संमती पत्र घेऊन ही लस देण्यात आली आहे.
आज भारतात बरेचशे मृत्यु हे ब्रेस्ट कॅन्सर व सर्वायकल कॅन्सरमुळे होतात. आता सर्वायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाली आहे. ही लस ९ ते १४ वयोगटातील मुलींना देवू शकतो . सीएसआर फंडाच्या माध्यमातून ही लस महापालिकेस उपलब्ध झाली. ही लस टप्प्या टप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळेतीलविद्यार्थीनीना दिली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी यावेळी दिली. या प्रसंगी महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल, वैद्यकिय अधिकारी सुहासीनी बडेकर, डॉ. विनोद दौंड, डॉ. प्रज्ञा टिके यांच्यासह आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर, डॉ. निती उपासनी, उपायुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.