शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

त्याशिवाय शिंदे इतके धाडस करणार नाहीत; एकनाथ खडसेंनी व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 22:37 IST

कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार आयोजित केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण: सध्या जे राजकारण चालले आहे तो  शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असला तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळ घडतंय , असे म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद दिल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाहीत. कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे भविष्यात समोर येईलच असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणात केले.

कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.गेल्या ४० वर्षात असे राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतू तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल, अशी स्थिती आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.

प्रामाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलय. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होते, नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला. मागच्या आठवड्यात माझे बँक खाते सीझ करून खात्यात एक रुपयाही ठेवलेला नाही. त्यानंतर राहते घर १० दिवसात खाली करण्याची नोटीस आली. न्यायालयातून जावून स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय. असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हते, असे खडसे म्हणाले. 

अनेकांना मला छळता आलं असतं, माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुस-यांना नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका असते. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली. मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता, असे खडसे सत्कार समयी म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेeknath khadseएकनाथ खडसेShiv Senaशिवसेना