शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या

By अनिकेत घमंडी | Updated: January 31, 2024 17:17 IST

मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले.

डोंबिवली : दिवा शहरातून डोंबिवली येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे.  शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांना ने-आण करणारे पालक विशेषतः महिला या मोठ्याप्रमाणात दिवा-डोंबिवली-दिवा असा रोजचा प्रवास करतात. मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले.

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी सांगितले की, मुलांना शाळेत सोडते आणि आणते वेळीच फास्ट लोकल, एसी लोकल, दोन लोकलच्या वेळेलमधील अंतर खूप जास्त, नेहमीच उशिराने येणाऱ्या लोकल यामुळे उपलब्ध लोकल मध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी होते याशिवाय फलाटांवर खूप वेळ ताटकळत बसावं लागत, छोटेमोठे अपघात यासर्व गोष्टींना सामोरे जावे लागते.

दिवा स्थानकात सकाळी ९:४० ची कल्याण ला जाणारी लोकल गेल्यानंतर १० वाजताची एसी लोकल येते आणि त्यांनतर १० वाजून १८ मिनिटांची कल्याण लोकल येते सदर ची कल्याण लोकल नेहमीच ८ ते ९ मिनिटे उशिराने येते. सकाळी ९:४० नंतर साधारण अर्धा तास लोकल नसल्याने फलाटावर विद्यार्थी आणि पालकांची व इतर प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते.

त्याचप्रमाणे संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस म्हणजेच संध्याकाळी ५:१५ ते ६ वाजेपर्यंत डोंबिवली स्थानकातून दिवा स्थानकात येण्यासाठी १६ लोकल मुंबईच्या दिशेने जातात. 

या १६ लोकल पैकी तब्बल १२ लोकल या जलद आहेत या जलद लोकल पैकी फक्त १ लोकल ला दिवा स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय १ लोकल एसी आहे.म्हणजेच संध्याकाळी ५ : १३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असणाऱ्या १६ लोकल पैकी फक्त ४ लोकल या दिवा स्थानकात थांबतात. या ४ लोकल सुद्धा नेहमीच उशिराने धावत असल्यामुळे लोकल मध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे लहान मुलांना घेऊन लोकल मध्ये चढण्यासाठी त्यांच्या पालकांना खूप कठीण जाते. अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या चर्चेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी निश्र्चितच समस्या असून ती सोडवण्यावर भर देण्यात येईल असे खासदार शिंदे यांना आश्वासन दिले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीShrikant Shindeश्रीकांत शिंदे