शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशनला गाडी थांबली की ते गाडीत बसायचे,  नंतर सिग्नलला गाडी थांबली की ते महिला प्रवाशांना लक्ष्य करायचे

By मुरलीधर भवार | Updated: April 27, 2023 19:41 IST

अटक करण्यात आलेल्या चौकडीकडून साडे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

कल्याण -  रेल्वे स्थानकात गाडी थांबताच ते गाडीत बसायचे आणि सिग्नल येताच महिला प्रवाशांची पर्स चोरी करुन पसार व्हायचे. महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारणाऱ्या चार जणांच्या चौकडीस कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिासंनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौकडीकडून साडे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रवी गायकवाड, गणोश राठोड, प्रकाश नागरगोजे आणि तानाजी शिंदे अशी आहेत. काही दिवसापासून मेल एक्सप्रेस गाड्यातील महिला प्रवाशांना लक्ष्य करुन त्यांच्या पर्स चोरी केल्या जात असल्याच्या घटना घडत होत्या. त्याची गंभीर दखल पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी घेतली. या प्रकरणी लवकर तपास लावण्यात यावा असे आदेश दिले होते. या चोरीच्या घटनांचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस करीत होते. कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरशद श्ेाख यांनी चोरीच्या घटनांचा तपास सुरु केला. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासणी केली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित त्यांना आढळून आला. 

या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रवि गायकवाड असे सांगितले. त्याने अन्य साथीदारांची नावेही सांगितले. तो अन्य तीन साथीदारांच्या मदतीने रेल्वेतील महिला प्रवाशांना लक्ष्य करीत होता. मेल एक्सप्रेस गाडी रेल्वे स्थानकात थांबताच ते त्याठिकाणी रेल्वे बोगीत चढायचे. प्रवासा दरम्यान गाडीला सिग्नल मिळताच गाडी थांबल्यावर क्षणाचाही विलंब न करता महिला प्रवाशांच्या पर्स हिसकावून पसार व्हायचे. या चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघाजणांपैकी तीन जण पुण्यात आणि एक जण छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. या चौघांकडून जवळपास साडे नऊ लाख रुपये किंमतीचे त्यांनी चोरी केलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण