शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Corona Virus in KDMC: दुकानं बंदच्या निर्बंधावर काय म्हणाले केडीएमसी आयुक्त? व्यापाऱ्यांनी घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:34 IST

Kalyan Dombivli News: शनिवारी, रविवारी अनेक नागरिक सुट्टीनिमित्त बाहेर पडतात. अशा वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून दुकानं आणि फेरीवाले यांना या दोन्ही दिवशी बंदी घालण्यात आली आहे.

- मयुरी चव्हाण कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या  पार्श्वभूमीवर राज्यातील इतर शहरांप्रमाणे केडीएमसीने सुद्धा नवीन निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता  इतर दुकानं शनिवारी आणि रविवारी पूर्णत: बंद राहतील, असे निर्देश शुक्रवारी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानंतर शनिवारी या निर्णयावरून कल्याण आणि  डोंबिवलीतील काही व्यापा-यांनी गोंधळ घालत प्रशासनाला जाब विचारला. यासंदर्भात आयुक्तांनी लोकमतशी खास बातचीत केली आहे. इतर शहरातही असे निर्बंध लागू झाले आहेत. तेथील व्यापारी महापालिका प्रशासनाला पाठिंबा देत आहेत. त्याचप्रमाणे येथील व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला  पाठींबा द्यावा अशी रोखठोक भूमिका सूर्यवंशी यांनी मांडली आहे. (Shop keepers should close shops on Saturday, sunday due to corona.)

शनिवारी ,रविवारी अनेक नागरिक सुट्टीनिमित्त बाहेर पडतात. अशा वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून दुकानं आणि फेरीवाले यांना या दोन्ही दिवशी बंदी घालण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात आल्यावर पुन्हा  फेरविचार केला जाईल . हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा पार्सल सेवा सुरू आहेत असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. काही विशिष्ट ठिकाणच्या व्यापा-यांनीच याला विरोध केला असला तरी इतर सर्व ठिकाणची दुकाने बंदच आहे.  नाशिक, नागपूर  या शहरात यापूर्वीच दुकानं बंद ठेवण्यात आली. या निर्णयाला तेथील व्यापा-यांनी पाठींबा दिला. त्याचप्रमाणे नागरीकांचे हित लक्षात घेऊन येथील व्यापा-यांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे मत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे. 

डोंबिवलीतील व्यापा-यांनी  केडीएमसीच्या  विभागीय कार्यालयाजवळ एकत्र येत गोंधळ घातला व रास्ता रोकोही केला. यावेळी सोशल  डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसला. दरम्यान  व्यापा-यांच्या विनंतीवरून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 ही दुकानांची वेळ बदलून सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत दुकानं खुली ठेवण्यात प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र शनिवार रविवार चा निर्णय व्यापा-यांना मान्य नसल्याने त्यांनी  मोठ्या संख्येने गर्दी करत  साथरोग प्रतिबंध कायद्याला हरताळ फासल्याचे दिसून आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवली