शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये येणार युद्धनौका, पालिकेकडे सुपूर्द; दोन दिवसांत दुर्गाडी येथे होणार आगमन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 15:56 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारत आहे. त्यासाठी टी-८० युद्ध ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारत आहे. त्यासाठी टी-८० युद्ध नौका  महापालिकेस देण्याचा सामंजस्य करार नौदलाकडून यापूर्वीच झाला आहे. ही युद्ध नौका शनिवारी कुलाबा डॉक यार्ड येथे महापालिकेच्या हाती सुपूर्द करण्यात आली. येत्या दोन दिवसांत या युद्ध नौकेचे आगमन दुर्गाडी खाडीकिनारी होणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या साक्षीने मराठा आरमाराची स्थापना दुर्गाडी खाडी किनारी केली होती. मराठा आरमाराचे स्मारक उभे करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नौदलाचे संग्रहालय उभे राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून टी-८० युद्ध नौका उभी केली जाणार आहे. भारतीय नौदलाचा महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीसोबत नोव्हेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला होता. शनिवारी कुलाबा येथील डॉक यार्ड येथे टी-८० युद्ध नौका महापालिकेस सुपूर्द करण्यात आली.

नौदल, केडीएमसी अधिकाऱ्यांची उपस्थितीयाप्रसंगी महाराष्ट्र नौदल रिअल ॲडमिरल ए. ए. प्रमोद, कमांडर जिलेट कोशी, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, डॉ. विजय सूर्यवंशी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आदी मान्यवर उपस्थित होते.

भावी पिढीसाठी प्रेरणादायी स्मारकआयुक्त दांगडे यांनी सांगितले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. माजी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, नौदल संग्रहालयास मराठा आरमार स्मारकात युद्धनौका जतन करण्याची संकल्पना मी मांडली. ती प्रत्यक्षात साकार होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. टी-८० या युद्ध नौकेमुळे कल्याणमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे.  पुढील पिढ्यांसाठी प्रथमच या युद्ध नौकेच्या स्वरूपात एक प्रेरणादायी स्मारक किल्ले दुर्गाडी येथे उभारले जाणार आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल