मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण-कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला आज पुन्हा तपासकामाकरीत बुलढाणा येथील शेगावला नेण्यात आले होते. त्याची पहिली पोलीस कोठडी उद्या संपुष्टात येत असल्याने त्याला पुन्हा कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. तिचा मृतदेह बापगावजवळ फेकून दिला. त्याने कल्याणमधील एका बारमधून दारु खरेदी केली. त्यानंतर तो बुलढाणा येथील शेगावला पसार झाला होता. शेगाव येथील सलूनमधून त्याला अटक केली होती. आज पुन्हा तपासकामाकरीता आरोपी गवळीला तपास पथक बुलढाण्यातील शेगाव येथे घेऊन गेले हाेते. त्याला उद्या कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी विशाल यांची पिडीत मुलीशी आेळख होती. पिडीत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता जे. जे. रुग्णालयात पाठविला होता. पिडीत मुलीच्या मृत्यूचे खरे कारण जे. जे. रुग्णालयाच्या अंतिम वैद्यकीय अहवालानंतर समोर येणार आहे. हा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.
रुग्णालयाने मुलीच्या मृत्यूचा विषयीचा अ’डव्हान्स रिपाेर्ट दिला आहे. त्यानुसार मुलीचा हत्या गळा दाबल्याने झाली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपी विशाल याचा माेबाईल, त्याचा सीडीआर रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फूटेज गोळा करण्यात आले आहे. आरोपीच्या विरोधातील पुरावे पोलिस उद्या न्यायालयात सादर करणार आहेत. या प्रकरणात राज्य सरकारने ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.