शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठरावाविना तेव्हाही वगळली होती गावे - श्रीनिवास घाणेकर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:46 IST

KDMC News : २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारनेही २७ गावे वगळण्याचा ठराव मनपाने केला नसतानाही गावे वगळली होती, अशी बाब त्या वेळचे याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

कल्याण - केडीएमसीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय शुक्रवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या वेळी गावे वगळण्याचा ठराव महासभेत केला नसल्याने जाब विचारला आहे. तसेच आयुक्तांचे पत्र म्हणजे महासभेचा ठराव नाही, असे म्हटले आहे. मात्र, २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारनेही २७ गावे वगळण्याचा ठराव मनपाने केला नसतानाही गावे वगळली होती, अशी बाब त्या वेळचे याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.१९८३ पासून २७ गावे मनपामध्ये होती. मात्र, मनपाकडून सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने ही गावे वगळण्याची मागणी जोर धरताच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ती मनपातून वगळली. त्या वेळी औद्योगिक परिसर असलेला आजदे व चोळेचा परिसरही वगळला होता. त्या वेळी सरकारच्या निर्णयाविरोधात कौस्तुभ गोखले व श्रीनिवास घाणेकर यांनी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्या वेळी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे सांगत ती याचिका निकाली काढली होती.घाणेकर म्हणाले, ‘आता १८ गावे वगळण्याची याचिका न्यायप्रविष्ट आहे. याआधी याचिका दाखल केली होती. त्या वेळीही गावे वगळू नयेत, हीच मागणी केली होती. त्या वेळीही महासभेने गावे वगळण्याचा ठराव केला नव्हता. आताही १८ गावे वगळण्याचा ठराव महासभेने केलेला नाही.’न्यायालयाने १८ गावे वगळण्याची प्रक्रिया अयोग्य ठरविल्यास केडीएमसीचे क्षेत्रफळ पूर्वीप्रमाणे होईल. २०१५ मध्ये २७ गावे मनपात समाविष्ट झाली तेव्हा या गावांमध्ये १५ प्रभाग पाडले. त्यामुळे मनपात १२२ प्रभाग झाले. आता १८ गावे वगळण्याची घोषणा केल्याने १३ प्रभाग वगळले गेले आहेत. मनपा निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रभाग रचनेची तयारी बाधित झाली आहे. १८ गावे वगळण्याची प्रक्रिया रद्दबातल झाल्यास प्रभाग रचना बदलावी लागेल. तसेच निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

प्राणघातक हल्ला२००२ मध्ये २७ गावे मनपातून वगळल्यावर तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांच्या दालनात एक बैठक झाली होती. त्यात घाणेकर यांच्यासोबत खडाजंगी झाली होती. संघर्ष समितीचे अध्यक्ष दिवंगत दि. बा. पाटील हे घाणेकर यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर याचिकाकर्ते घाणेकर व गोखले यांच्यावर दोन भिन्न ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून हे दोघेही बचावले होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका