शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जागरुक नागरिक फाऊंडेशनचा कल्याणमधील धरणे आंदाेलन मागे घेण्यास नकार

By मुरलीधर भवार | Updated: December 8, 2022 16:55 IST

नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क: कल्याण-डोंबिवलीतील नागरीकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून चालढकल सुरु आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र फाऊंडेशने धरणे आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.

फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून शहरातील विविध नागरी प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. फाऊंडेशने २०१८ साली बेमुदत उपोषण केले होते. भाजप आमदार रविंद् चव्हाण यांच्या मध्यस्थीपश्चात हे  आंदोलन मागे घेण्यात आले. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बैठक घेतली जाईल. त्यानंतर ही बैठक घेतली गेली नाही. आत्ता पुन्हा याच मुद्यावर बेमुदत धरणो आंदोलन ५ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी फाऊंडेशनला पत्र दिले.

ज्या मुद्यावर हे आंदोलन सुरु आहे. ते सगळे विषय धोरणात्मक निर्णयाशी निगडीत आहे. त्यामुळे धरणे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली आहे. मात्र धरणे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात ठोस धोरणात्मक निर्णय जोर्पयत घेतला जात नाही. तोर्पयत हे आंदोलन सुरुच ठेवले जाईल. येत्या आठवडय़ात आंदोलनाची दिशा बदलली जाईल असा इशारा घाणेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण