शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रिसेप्शनिस्टनी ‘गोकुळ’च्या वहिनीच्या कानशिलात मारल्याचा व्हिडीओ उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:23 IST

गोकुळ, त्याच्या भावाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

कल्याण : पूर्वेकडील नांदिवली भागातील एका खासगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग झाल्याच्या घटनेत बुधवारी नवा ट्विस्ट आला. रिसेप्शनिस्टने गोकुळ झा याची वहिनी अनन्या हिच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ उजेडात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ, त्याचा भाऊ रंजीत यांना बुधवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सोमवारी क्लिनिकमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर गोकुळ पसार झाला होता. पोलिसांची पथके त्याला शोधत होती. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला नेवाळी नाका येथे पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.सरकारी वकील अनंत अडसर यांचा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना आरोपी गोकुळने अरेरावी केली. पोलिसांना धक्काबुक्की करत तो गोंधळ घालू लागला. यावर न्या. आरती शिंदे यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून गोकुळला सक्त ताकीद दिली. न्यायालयाच्या कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल होईल, असे सांगितल्यावर तो शांत झाला, अशी माहिती पीडितेचे वकील ॲड. हरीश नायर यांनी दिली. गोकुळने न्यायालयात कोणतीही अरेरावी केली नाही. तो त्याची बाजू मांडत होता. मी मारहाण केली असताना माझ्या भावाला का आरोपी केले, असे तो न्यायालयाला सांगत होता. पण, न्यायालयाने कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करू, असे सांगितल्यावर तो शांत बसला, अशी माहिती आरोपींचे वकील ॲड. संजय धनके यांनी दिली. गोकुळचा त्या तरुणीचा विनयभंग तसेच तिला मारहाण करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. या वादाला नाहक मराठी-अमराठी असे वळण दिले, असेही धनके यांनी सांगितले.

पीडितेची गोकुळच्या वहिनीला मारहाणक्लिनिकमध्ये ज्या ठिकाणी गोकुळने पीडित रिसेप्शनिस्टला मारहाण केली. त्या ठिकाणचे दुसरे सीसीटीव्ही फूटेज उजेडात आले. त्यात संबंधित रिसेप्शनिस्टने गोकुळची वहिनी अनन्या झा हिच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. वहिनीला रिसेप्शनिस्टने मारहाण केल्याने गोकुळने तिला मारहाण केली, असे झा कुटुंबाचे म्हणणे आहे तर पीडितेला गोकुळने अमानुष मारहाण केल्यानंतरही त्याची वहिनी दिराला जाब का विचारत नाही, या रागातून त्या रिसेप्शनिस्टने वहिनीच्या कानशिलात लगावली, असे पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे; परंतु, या नव्या व्हिडीओमुळे प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याची चर्चा आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkalyanकल्याण