शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात ३० कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम

By अनिकेत घमंडी | Updated: May 20, 2024 07:55 IST

डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानक आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक मधील सुमारे 30 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. "पॉज'तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे.

रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना "अँटी रेबीज लस' देण्याचा उपक्रम "पॉज'ने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते; मात्र भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. रविवारी, 19 मे ला डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानक आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक मधील सुमारे 30 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

ही मोहीम रात्री राबविण्यात येते त्यासाठी 2 कारणे आहेत

1. रात्री प्लॅट फॉर्म रिकामे असतात व राहणारे श्वान दिसून लसीकरण सोपे जाते.2. दिवसा जास्त तापमानात श्वान लपून बसतात किंवा शेड मध्ये आसरा घेतात, अशावेळी त्याना शोधणे मुश्किल असते.

पुढील टप्प्यामध्ये कल्याण, उल्हास नगर, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथेही ही मोहीम राबवण्यात येईल असे पॉज चे स्वयंसेवक प्रशांत बुन्नावार ह्यांनी सांगितले. रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "पॉज'तर्फे यांचे लसीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे. दरम्यान, कोपर, ठाकुर्ली रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी दिली. 

रस्त्यावरील भटक्‍या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज)ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पॉज संस्थेचे तीन स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे, रीमा देशपांडे , सतीश सोहोनी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबवली. गेली 11 वर्षे ही मोहीम पॉज अखंड रित्या रावबत आहे आणि त्यामुळेच कल्याण-डोंबिवली मध्ये आतापर्यंत 1 ही रेबीज मुळे मानव मृत्यू ची नोंद नाही असे निलेश भणगे ह्यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण