शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेल्वे स्थानकात कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम; ३१ श्वानांना दिली लस

By अनिकेत घमंडी | Updated: May 27, 2024 08:42 IST

विवारी 26 मे ला कल्याण रेल्वे स्थानक आणि परिसर मधील सुमारे 31 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. "पॉज'तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना "अँटी रेबीज लस' देण्याचा उपक्रम "पॉज'ने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते; मात्र भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. रविवारी 26 मे ला कल्याण रेल्वे स्थानक आणि परिसर मधील सुमारे 31 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

ही मोहीम रात्री राबविण्यात येते त्यासाठी 2 कारणे आहेत

1. रात्री प्लॅट फॉर्म रिकामे असतात व राहणारे श्वान दिसून लसीकरण सोपे जाते.2. दिवसा जास्त तापमानात श्वान लपून बसतात किंवा शेड मध्ये आसरा घेतात, अशावेळी त्याना शोधणे मुश्किल असते.

पुढील टप्प्यामध्ये उल्हास नगर, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथेही ही मोहीम राबवण्यात येईल असे पॉज चे स्वयंसेवक प्रशांत बुन्नावार ह्यांनी सांगितले.

रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "पॉज'तर्फे यांचे लसीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे. दरम्यान, डोंबिवली,  कोपर, ठाकुर्ली आणि आता कल्याण  रेल्वेस्थानक परिसरातील भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी दिली. 

रस्त्यावरील भटक्‍या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज)ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पॉज संस्थेचे तीन स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे, रीमा देशपांडे , बालाजी हरिहरन, पियुष हाटले आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबवली. गेली 11 वर्षे ही मोहीम पॉज अखंड रित्या रावबत आहे आणि त्यामुळेच कल्याण-डोंबिवली मध्ये आतापर्यंत 1 ही रेबीज मुळे मानव मृत्यू ची नोंद नाही असे निलेश भणगे ह्यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण