शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांचा फटका सर्व सामान्य नागरीकांना, वीज कार्यालयावर माजी उपमहापौरांनी काढला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:43 IST

या बाबत केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या उपस्थितीत अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने टाटा पॉवर येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

कल्याण - अनधिकृत बांधकामाचा फटका सर्व सामान्य नागरीकांना बसत आहे. कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील गेल्या चार दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु होता. एका ट्रान्सफार्मरमधून क्षमतेपेक्षा जास्त लोकांना वीज पुरवठा केला जात होता. या बाबत केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या उपस्थितीत अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने टाटा पॉवर येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

पिसवली परिसरात टेकडीलगत असलेल्या भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकाम सुरु आहे. या बांधकामांना वीज पुरवठा केला जातो. जे अधिकृत घरांमध्ये राहतात. त्या सर्व समान्य नागरीकांना याचा फटका बसत आहे. एका ट्रान्सफार्मरमधून क्षमतेपक्षा जास्त विज पुरवठा केला जात आहे. गेल्या चार दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या टाटा नाका येथील कार्यावर मोर्चा काढला. या मोर्चात माजी महापौर भोईर यांच्या सह संस्थेचे अध्यक्ष गिरधर कुऱ्हाडे आणि महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. अडचणी सांगितल्या. माजी उपमहापाैर भोईर यांनी सांगितले की, पिसवली परिसरातील रहिवासी काॅलनीला ज्या ट्रान्सफार्मरमधून वीज पुरवठा केला जाताे. त्याच ट्रान्सफार्मरमधून टेकडीलगत असलेल्या बेकायदा चाळींना वीज पुरवठा दिला गेला आहे. त्यामुळे ट्रान्सफार्मरवर जास्तीच्या वीज पुरवठ्याचा लाेड येताे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत हाेताे. तसेच वीज वाहिन्या जळण्याचे प्रकार हाेत आहेत. अधिकृत वीज पुरवठा घेणाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे याकडे लक्ष वेधले.आजच्या माेर्चा दरम्यान नागरीकांनी मांडलेल्या व्यथा एकून घेत वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे. तसेच बेकायदा वीज कनेक्शन खंडीत करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणelectricityवीज