शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील भुयारी गटार योजना वादात? ईगल कंपनीच्या निविदा रद्द करा - अविनाश जाधव

By सदानंद नाईक | Updated: October 30, 2023 18:53 IST

उल्हासनगरात बांधण्यात येत असलेले शेकडो कोटीच्या निधींतील रस्ते निकृष्ट बांधल्याचे उघड झाले.

उल्हासनगर : चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाण पुलाच्या ठेकेदारांने शहरातील ४१६ कोटीची भुयारी गटार योजनेचा ठेका घेतला आहे. उड्डाणपूला प्रमाणे गटारीचे काम निकृष्ट होणार असल्याने, ईगल कंपनीच्या ठेका रद्द करण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आयुक्त अजित शेख यांची भेट घेऊन केली.

उल्हासनगरात बांधण्यात येत असलेले शेकडो कोटीच्या निधींतील रस्ते निकृष्ट बांधल्याचे उघड झाले. तसेच ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही शहरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे ४१६ कोटींची भुयारी गटार योजना वादग्रस्त ठरणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. दरम्यान चिपळूण येथे बांधण्यात येत असलेला हायवे रस्त्यावरील उड्डाणपूल कोसळल्याने, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईगल कंपनीवर टीका केली होती. त्याच ईगल कंपनीने शहरातील ४१६ कोटीचा भुयारी गटार योजनेचा ठेका घेऊन काही ठिकाणी काम सुरू केली. मात्र गटारीचे कामावर सर्वस्तरातून टिका होत आहे. 

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी दुपारी पक्षाच्या शिष्टमंडळासह आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी चिपळूण येथील उड्डाणपूल कोसळल्याची आठवण आयुक्तांना करून देऊन निकृष्ट काम करणाऱ्या ईगल कंपनीला ४१३ कोटीचे भुयारी गटार योजनेचे काम दिल्याचे सांगितले. निकृष्ट काम करणाऱ्या ईगल कंपनीच्या ठेकेदाराला भुयारी गटार योजना देऊ नका. अश्या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले. एका आठवड्यात याबाबत निर्णय घेतला नाहीतर, मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा जाधव यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिला. तर आयुक्तांनी नियमानुसार निविदा प्रक्रिया करून भुयारी गटारीचा ठेका ईगल कंपनीला दिल्याचे यावेळी सांगितले. 

भुयारी गटारीची योजना फसवी शहरात ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही शहरात पाणी टंचाई कायम आहेत. मात्र स्थानिक नेते व अधिकाऱ्यांचे राहणीमान उंचविले अशी टीका मनसेकडून झाली. पाणी योजने प्रमाणे भुयारी गटार योजने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जाधव यांचा सत्कारमहापालिकेच्या मनसे कर्मचारी संघटना कार्यालयात नेते अविनाश जाधव यांचा कामगार नेते दिलीप थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय घुगे, सचिन कदम, मैनुद्दीन शेख, मनोज शेलार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरAvinash Jadhavअविनाश जाधव