शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका टॅक्स पावती वाटप प्रकरण, महिलांचे धरणे आंदोलन

By सदानंद नाईक | Updated: May 30, 2024 18:34 IST

या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने गुरवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केल्यावर, मोबदला देण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले.

उल्हासनगर : महापालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या पावत्या बचत गटाच्या महिलांनी घरोघरी वाटल्यानंतरही, ठेका घेतलेल्या कोलब्रो कंपनीने गेल्या ८ महिन्यापासून मोबदला दिला नाही. या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने गुरवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केल्यावर, मोबदला देण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले.

 उल्हासनगरातील मालमत्तेचे सर्वेक्षण व मालमत्ता कराच्या पावत्या घरोघरो वाटप करण्याचा ठेका कोलब्रो नावाच्या कंपनीला महापालिकेने दिला. मालमत्ता कर पावत्या घरोघरी वाटप करण्याचे काम शहरातील बचत गटाच्या महिला करतात. मात्र केलेल्या कामाचा मोबदला गेल्या ८ महिन्यापासून कंपनीने दिला नसल्याने, महिलांवर उपासमारीची वेळ आली. याबाबत काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, गटनेते अंजली साळवे यांनी पुढाकार घेऊन आवाज उठवित महापालिकेकडे पाठपुरावा केला. मालमत्ता सर्वेक्षण व मालमत्ता कर बिले घरोघरी देण्यासाठी महापालिकेने कोलब्रो कंपनीला कोट्यवधी रुपये अदा केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.

 महापालिका रुग्णालयातील सुरक्षारक्षक प्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ बचत गटाच्या महिलांवर आल्याचा आरोप रोहित साळवे यांनी केला. बचत गटाच्या महिलांचा मोबदला मिळण्यासाठी गुरवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. उपायुक्त डॉ सुभाष जाधव व कर निरीक्षक जेठानंद करमचंदानी ह्यांनी आंदोलकांची भेट घेऊन मोबदला देण्याचे लेखी आश्वासन दिले. धरणे आंदोलनात माजी नगरसेविका अंजली साळवे, शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह मनीषा महाकाळे, सिंधुताई रामटेके, मालती गवई, कालिंदी गवई, मंगला मुजुमदार, राकेश मिश्रा, अनिल यादव, शैलेंद्र रुपेकर, फरियाद शेख, फॅमिदा सैयद आदीजन उपस्थित होते.

 कोलब्रो कंपनीची चौकशी महापालिका मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यासाठी कोट्यवधीचा निधी कोलब्रो कंपनीला दिला. प्रत्यक्षात सर्वेक्षण झाले असल्यास, महापालिकेच्या उत्पन्नात किती भर पडली. असा प्रश्न काँग्रेस पक्षाने केला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेतेवर यांनी कंपनीच्या चौकशीचा अहवाल मागविल्याने, अनेकांचे धाबे दणाणून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चौकशी अहवाल सार्वजनिक करा कोलब्रो कंपनीच्या कामाची चौकशी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. कोट्यवधी रुपये मालमत्ता सर्वेक्षणावर खर्च करूनही महापालिकेला एक पैशा फायदा झाला नसल्याचा आरोप होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर