शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका शाळा इमारत बांधून सज्ज,  मात्र मुलांची किलबिल नाही, इमारतीचे उदघाटन कधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:24 IST

शाळा इमारत बांधण्याचे रखडल्यावर, महापालिकेने शाळा बांधण्याचा ठेका दुसऱ्या ठेकेदाराला दिला. त्यानंतर एका वर्षात चार मजली इमारत उभी राहिली...

उल्हासनगर : महापालिका शाळा क्रं-२४ व १८ ची इमारत तब्बल ७ वर्षानंतर बांधून पूर्ण होऊनही शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची किलबिल सुरु झाली नाही. शेकडो मुलांना यावर्षीही खाजगी शाळेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार असल्याची टिका नागरिकांकडून होत आहे. उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात महापालिका शाळा क्रं-२४ ही मराठी माध्यमाची तर शाळा क्रं-१८ ही हिंदी माध्यमाची शाळा आहे. दोन्ही शाळेत ७ वर्षांपूर्वी एकूण ९०० पेक्षा जास्त मुलांची संख्या होती. पुनरबांधणीच्या नावाखाली शाळेतील मुले एका खाजगी शाळेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीण्यासाठी पाठविले. शाळा इमारत बांधण्याचे रखडल्यावर, महापालिकेने शाळा बांधण्याचा ठेका दुसऱ्या ठेकेदाराला दिला. त्यानंतर एका वर्षात चार मजली इमारत उभी राहिली.

 गेल्या ७ वर्षात दोन्ही शाळेतील शेकडो मुले एका खाजगी शाळेच्या छताखाली शिक्षण घेत आहेत. तसेच दोन्ही शाळेतील मुलांची संख्याही निम्यावर आली. यावर्षी नवीन इमारती मध्ये मुलांची किलबिल राहणार असे वाटत असताना, इमारतीचे उदघाटन झाले नाही. त्यामुळे यावर्षीही मुले एका खाजगी शाळेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. महापालिका शिक्षण विभागाने शाळा क्रं-२४ व १८ ही नवीन इमारती मध्ये सुरु होणार असल्याचे संकेत दिले होते. तसेच ऐक शाळा इंग्रजी माध्यमाची तर तीन शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रशासन अधिकारी कुंदा पंडित यांनी सांगितले होते. मात्र महापालिकेच्या सेमी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरूच झाल्या नाहीत. तसेच नवीन इमारत बांधून पूर्ण झाल्यावरही, त्यामध्ये शाळा क्रं-२४ व १८ सुरु करता आले नाही. समाजसेवक प्रवीण माळवे, मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांनी इमारतीच्या उदघाटनाचा प्रश्न बाजूला ठेवून इमारती मध्ये वर्ग सुरु करण्याचे सल्ला दिला. याबाबत आयुक्त मनिषा आव्हाळे, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी कुंदा पंडित यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र झाला नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर