शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा जास्त? तरीही पाणी टंचाई कशी? आयुक्तांचे कारवाईचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:40 IST

उल्हासनगर महापालिकेची लोकसंख्या ७ लाख पेक्षा जास्त असून एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत एमआयडीसी कडून जास्तीचा पाणी पुरवठा जास्त होऊनही पाणी टंचाई कशी? असा प्रश्न आयुक्तानी अधिकाऱ्यांना केला. पाण्याचे वितरण समसमान होण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाणी चोरट्यावर कारवाईचे संकेत दिल्याने, पाणी चोरांचे धाबे दणाणले आहे. 

उल्हासनगर महापालिकेची लोकसंख्या ७ लाख पेक्षा जास्त असून एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. लोकसंख्येच्या प्रमाणात ९० टक्के एमएलडी पाणी पुरेसे असताना शहराला जास्तीचा पाणी पुरवठा होतो. तरीही शहरांत पाणी टंचाई निर्माण झालीच कशी? असा प्रश्न आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारला आहे. सुभाष टेकडी, मराठा सेकशन, महादेवनगर, गायकवाड पाडा, तानाजीनगर आदी ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊन राजकीय नेते व माजी नगरसेवकांनी महापालिकेला निवेदन देवून कारवाईची मागणी केली. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पंपिंग स्टेशन, जलवाहिनी आदीची पाहणी करून अवैध नळ lजोडणीवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.

 पाणीगळतीवर कोट्यावधीचा खर्च महापालिका पाणी गळतीवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणी गळती कायम आहे. त्या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यापूर्वी शहरात पाणी पुरवठा टंचाई निर्माण झाल्यावर श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. त्यानंतर ३५० कोटीची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली असून योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १०३ कोटीतून कामे सुरु झाली. तरीही शहरात पाणी टंचाई निर्माण होऊन श्वेतपत्रिका काढण्याची मागणी होत आहे. 

खेमानी परिसरात तलावाचे स्वरूप शहरात विविध ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असताना खेमानी टेकडी परिसरात रस्त्याहून पाणी वाहत आहे. रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याची टीका स्थानिक प्रा. प्रवीण माळवे यांनी केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर