शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण लोकसभेच्या विजयाची सभा अंबरनाथ शिवमंदिरासमोर घेणार; उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन

By मुरलीधर भवार | Updated: January 13, 2024 17:05 IST

उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या विजयाची सभा कुठे घेणार याचे ठिकाणच जाहिर केले.

मुरलीधर भवार, कल्याण : उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या विजयाची सभा कुठे घेणार याचे ठिकाणच जाहिर केले. विजयाची सभा अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिरासमोर घेणार असल्याचे जाहिर केले. लोकसभा निवडणूकीत गद्दा्रांना गाडा असे आवाहन शिवसैनिकांनी ठाकरे यांनी यावेळी केले. सगळे भाड खाऊन मिंधे गटात गेले आहेत. कल्याणच्या शिवसैनिकांना भेटायला आलो आहे. कल्याण जिवंत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी, वंचित आणि आरपीआयचे लोक आहे. एक वेगळीच एकजूट दिसते. कल्याण लोकसभेवर एक वेगळी जबाबदारी आहे. गद्दारींची घराणेशाही गाडून टाकायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यास कलंक लावणारा एक सुद्धा गद्दार महाराष्ट्रात जन्माला येता कामा नये.

आज मी अंबरनाथच्या शिवमंदिरात गेलो होते. काल मोदीजी काळाराम मंदिरात जाऊन आले. आज मिंधे इथेच कुठे तरी स्वच्छ लादी स्वत:च्या पावलांनी कलूषित करीत आहेत. साफसफाई आधीच कोणाकडून घ्यायची नंतर छान कपड्यात केवळ फडकं फिरवायचे. त्यांनी तशी धुणीभांड्याची सवय आहेच. त्याच्याठीच ते दिल्लीला जातात. साफसफाई करायची असेल तर अंबरनाथ मंदिरात जाताना जो नाला आहे. त्या नाल्याची साफसफाई करा. मिंधेना आव्हान आहे. मोदींजीना सांगणे आहे. त्यांनी त्यांच्या जादूच्या झाडूने तो नाला साफ करुन द्या असे आवाहन ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत, खासदार राजन विचारे यांच्यासह पदाधिकारी शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, सचिन बासरे आदी या प्रसंगी होते.

ठाकरेंचे कल्याणमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. भगवे झेंडे, फूलांची उधळण, भगव्या टोप्या परिधान करुन शिवसैनिक ढोल ताश्यांच्या गजरात नाचत ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. ठाकरे यांनी शाखेत प्रवेश करताच एकच गर्दी उसळली. या गर्दीत काही शिवसैनिकांची चेंगराचेंगरी झाली. अनेक तरुण शिवसैनिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ठाकरे आगमानासह भाषणाचे शूटिंग करण्यात दंग हेाते.

टॅग्स :kalyanकल्याणUddhav Thackerayउद्धव ठाकरे