शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

कल्याण दुर्गाडी खाडी पूलाच्या दोन लेन जूनच्या पहिल्या आठवडय़ात खुल्या होणार, आयुक्तांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 19:12 IST

KDMC News : सहा पदरी दुर्गाडी खाडी पूलाच्या दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात असताना कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पाहणी केली.

कल्याण - कल्याण दुर्गाडी खाडी पूलाच्या सहा लेन पैकी दोन लेन येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात वाहतूकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ब:यापैकी मार्गी लागणार आहे. दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात आहे.सहा पदरी दुर्गाडी खाडी पूलाच्या दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात असताना कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार, नगररचनाकार रघुवीर शेळके आदी उपस्थित होते. कल्याण भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडी पूल हा दोन लेनचा होता. युती सरकारच्या काळात त्याचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेला पूल हा वाहतूकीसाठी अपुरा पडत होता. याच पुलाला समांतर सहा पदरी दुर्गाडी खाडी पूलाला २०१६ मध्ये मंजूरी दिली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूलाचे भूमीपूजन करण्यात आले. पूलाच्या कामासाठी नेमलेल्या कंत्रटदाराकडून दिरंगाई होत असल्याने त्याला दिलेले कंत्रट दोन वर्षानंतर रद्द करण्यात आले. १०१ कोटी रुपये खर्चाचे सहा पदरी पूलाचे काम तांदळकर आणि थोरात कंपनीला देण्यात आले. या कंपनीने रायगड येथील सावित्री पूल तयार केला होता. त्या कंपनीने पूलाचे काम युद्धपातळीवर उचलले. मात्र २०१९ मध्ये अतिवृष्टीचा बसलेला फटका आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे पूलाच्या कामाची गती मंदावली होती. पूलाच्या सहा लेनपैकी दोन लेन जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात खुल्या झाल्यावर जुना अस्तित्वात असलेला दोन लेनचा पूल आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पूलाच्या दोन लेन खुल्या झाल्यावर वाहतूकीसाठी चार लेन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर उर्वरीत चार लेनही भविष्यात खुल्या केल्या जातील. भिवंडी-कल्याण-शीळ रोडवरील दुर्गाडी खाडी पूल हा महत्वाचा पूल आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कल्याण पत्री पूल मार्गी लागला. त्या पाठोपाठ दुर्गाडीच्या दोन लेन खुल्या होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

कल्याण रिंग रोडच्या कामासाठी मागितले पोलिस संरक्षणदुर्गाडी खाडी पूलाच्या कामाची पाहणी केल्यावर महापालिका आयुक्तांनी कल्याण रिंग रोडच्या दुर्गाडी ते मांडा टिटवाळा दरम्यानची पाहणी केली. रिंगरोडचे या टप्प्यातील  ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी अडथळे आहेत. रिंग रोडचे काम ज्या ठिकाणी पूर्णत्वास आले आहे त्याचा वापर सुरु झाला आहे. झालेले काम जून महिन्यार्पयत महापालिकेस हस्तांतरीत केले जाईल. ज्याठिकाणी कामला विरोध आहे. त्यासाठी पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी एमएमआरडीएच्या वतीने रेलकॉन कंत्रटदार कंपनीने पोलिस व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका