शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीने दिलेल्या धडकेत कल्याणमध्ये दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:08 IST

वालधुनी परिसरातील जगदीश दुग्धालयासमोर बुधवारी रात्री ९.३० वाजता एका भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण : वालधुनी परिसरातील जगदीश दुग्धालयासमोर बुधवारी रात्री ९.३० वाजता एका भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गणेश दराडे व त्यांचा मित्र बाळकृष्ण धुळेकर हे एका मोटारीने जात होते. रस्त्यात त्यांना त्यांचा मित्र विजय सोनावणे भेटला. सोनवणे व दराडे हे दोघेही पेस्ट कंट्रोलचे काम करतात. दराडे यांनी विजयला पाहून गाडी थांबवत रस्त्याच्या बाजूला उभी केली. तिघेही गाडीमागे बोलत होते. त्याच वेळी उल्हासनगरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीने या तिघांसह मोटाराला जोराची धडक दिली. या घटनेत दराडे आणि सोनावणे यांचा मृत्यू झाला. तर, धुळेकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर चव्हाण करत आहेत.भरधाव मोटारीने तिघांसह उभ्या असलेल्या मोटारीला ठोकल्याने तेथे गाडी एका विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे वालधुनी परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अंधारात मदतकार्य करताना आजूबाजूच्या नागरिकांची धावपळ उडाली. या अपघातामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस व रुग्णवाहिका येण्यापूर्वीच नागरिकांनी अपघातग्रस्तांना रिक्षाने रुग्णालयात नेले होते. दरम्यान, घटनास्थळी मनपाने जाहिरातीचा खांब उभारण्यासाठी खड्डा खोदला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तोच भाग वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Accidentअपघात