शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली शिवसेना शहर शाखेत दोन गट परस्परांना भिडले; शिंदे पिता-पुत्रांंचा फोटो लावण्यावरून सुरू होता वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेनेच्या शहर शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ...

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : डोंबिवलीत शिवसेनेच्या शहर शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यावरून शिंदेसमर्थक आणि उद्धव ठाकरेसमर्थक एकमेकांना भिडले. दोघांनी शाखेवर ताबा असल्याचा दावा करीत शाखेत ठाण मांडले. यावेळी शाखेत अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यावरून शाखेत दोन्ही गटांमध्ये प्रचंड वाद झाला. 

राज्याचे राजकारण तापले असून, खरी शिवसेना कोणाची, असा सवाल शिंदे व ठाकरे गटांकडून केला जात आहे. शाखा ताब्यात घेण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप केल्यावर डोंबिवली शिवसेना शहर शाखेतील शिंदे पिता-पुत्रांची छायाचित्रे काढली होती. केवळ स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो कायम ठेवण्यात आले होते.

मंगळवारी दुपारी शाखेत उद्धव ठाकरेसमर्थक आणि शहरप्रमुख विवेक खामकर हे बसलेले असताना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे समर्थक शाखेत घुसले.  त्यांनी त्याठिकाणी शिंदे पिता-पुत्रांचा  फोटो लावला. त्याला ठाकरे यांच्या गटाने तीव्र विरोध केला. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. त्यांच्यात प्रचंड राडा झाला. यावेळी शिवसेनेचे सदानंद थरवळ आणि कविता गावंड हे शाखेत होते.  शाखेत राडा झाल्याचे कळताच त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला. दोन्ही गटांत मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तब्बल तीन तास शाखेत पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा सुरू होती. याबाबत रमेश म्हात्रे म्हणाले की, शिंदे यांचा फोटो काढला होता. तो पुन्हा लावण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे गरजेचे होते. तो पुढाकार आम्ही घेतला. शहरप्रमुख खामकर म्हणाले की, मंगळवारी १५० कार्यकर्ते अचानक शाखेत आले. त्यांनी येऊन शिवसेना शाखा सोडण्याकरिता जबरदस्ती केली. आम्ही शाखा सोडणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, असे सांगितले. 

दरम्यान, शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी डोंबिवलीच्या सर्वेश हॉलमध्ये सभासद नोंदणीचा कार्यक्रम ठेवला आहे. ठाकरे गट शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेेनेतील गटातटाच्या वादातून डोंबिवली शहरप्रमुख खामकर यांना अटक झाली होती. एक दिवसाच्या अटकेनंतर त्यांना जामीन मिळाला. या पार्श्वभूमीवर दोन्ही गट मंगळवारी पुन्हा परस्परांना भिडल्याचे चित्र दिसले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे