शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा आता तूच बुद्धी दे! वाहतूक नियमांचे धडे देण्यासाठी रस्त्यावर अवतरले माघी गणपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 14:05 IST

Maghi Ganesh Jayanti: माघी गणेशोत्सव निमित्ताने गणपती बाप्पाच्या प्रतिकात्मक भूमिकेत त्यांनी वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या परिवारांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क बत्तिसावा रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत माघी गणेशोत्सवानिमित्त समाजामध्ये जनजागृती व्हावी वाहतुकीचे नियम सामान्य जनतेने पाळावेत अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मंगळवारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी चौक, सहजानंद चौक, या ठिकाणी माघी गणेशोत्सव निमित्ताने गणपती बाप्पाच्या प्रतिकात्मक भूमिकेत जय गजानन पाटील व आदित्य केशव मालुंजकर यांनी रिक्षा, कार व मोटरसायकल चालक यांना वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करणे गरजेचे आहे असा संदेश दिला. 

पोलीस आयुक्तालय वाहतूक उपशाखा कल्याण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य आरएसपीचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथे हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्फत आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी सुरुवात झाली. याप्रसंगी एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळणे किती गरजेचे आहे याची जाणीव करून दिली. यावेळी यावेळी अधिकारी बन्सीलाल महाजन, गजानन पाटील, विजय भामरे आनंत जगे, पोलीस हवालदार श्याम जगताप पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी आदींनी सहकार्य केल्याचे शिंपी म्हणाले. या उपक्रमाबद्दल माजी नगरसेवक सुनील वायले यांनी कौतुक केले. रोटी डे ग्रुप,व स्वामीनारायण हॉलचे संचालक दिनेश ठक्कर,तरुण नागडा केतन शहा यांनी महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना १५ किलो अन्नधान्य किट दिले. 

गांधीगिरी करत गुलाबपुष्प दिले भेट कार्यक्रमाच्या अखेरीस गजानन चौकात सीटबेल्ट न लावणाऱ्या कार चालक,हेल्मेट न घालता दुचाकी चालक यांना गांधीगिरीच्या मार्गाने गुलाब पुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळा, परिवाराची काळजी घ्या, व पोलीस विभागाला,आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkalyanकल्याणtraffic policeवाहतूक पोलीस