शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तीन भावंडे शाळेत गेली; मात्र सापडली खडवली नदीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 07:26 IST

पोलिसांच्या अथक प्रयत्नाअंती मुलांची घरवापसी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एका कुटुंबातील तीन भावंडे शाळेत गेली होती. मात्र, ती शाळेजवळून अचानक बेपत्ता झाली. त्या मुलांचा शोध लागत नसल्याने हवालदिल झालेल्या मुलांच्या वडिलांनी महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने तीनही मुलांचा शोध लावला आहे. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. ही मुले खडवली नदीवर अंघोळीसाठी गेली होती. मात्र, पोलिस वेळीच त्याठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. 

कल्याण पश्चिमेच्या रामबागेत एक कुटुंबिय राहते. या कुटुंबातील एक मुलगी आणि दोन मुले ही जोशीबागेतील एका शाळेत शिकतात. सकाळी ही तिन्ही मुले शाळेत गेली हेाती. या तिन्ही मुलांना शाळेच्या गेटवर शिक्षकांनी पाहिले होते. मात्र, ही मुले घरी न आल्याने कुटुंबिय चिंताग्रस्त झाले. त्या मुलांच्या वडिलासह इतरांनी शोध सुरू केला. 

मुलींचा काही पत्ता लागत नसल्याने हवालदिल झालेल्या मुलांच्या वडिलांनी महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली. तीन मुले हरविली असल्याने पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने आणि पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने मुलांचा तातडीने तपास सुरू केला. 

सीसीटीव्हीमुळे लागला शोधमुले राहत असलेली वस्ती, शाळा या परिसरासह कल्याण स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. ही मुले कल्याण स्टेशनमधील सीसीटीव्हीत दिसून आली. ही मुले कल्याण स्टेशनहून आसनगावच्या दिशेने ट्रेनने गेल्याचे दिसून आले. ही मुले ट्रेनने खडवली स्थानकात गेली. त्या स्थानकातून त्यांनी खडवली नदी गाठली. ही मुले खडवली नदीवर अंघोळीकरिता केली होती. मुले नदीत अंघोळीला उतरण्याच्या बेतात होती. मात्र, वेळीच त्याठिकाणी पोलिस पोहचले. पोलिसांनी त्या मुलांना घेऊन कल्याण गाठले. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.