शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:38 IST

kalyan : जवळपास नऊ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने अंजली हॉस्पिटलचा (ऑक्झिलियम हेल्थकेअर) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. थकित वीजबिलाचा भरणा करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही हॉस्पिटलने बिलाचा भरणा केला नाही.

कल्याण : थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या कल्याण पूर्व विभागातील अंजली हॉस्पिटलकडून (जूने नाव- ऑक्झिलियम हॉस्पिटल) तब्बल तीन लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व उपविभाग एक आणि भरारी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत ही वीजचोरी उघड झाली असून चोरीच्या विजेचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत हॉस्पिटलला नोटिस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत संबंधित रकमेचा भरणा न झाल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी आवश्यक फिर्याद देण्यात येणार असल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे.

जवळपास नऊ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने अंजली हॉस्पिटलचा (ऑक्झिलियम हेल्थकेअर) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. थकित वीजबिलाचा भरणा करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही हॉस्पिटलने बिलाचा भरणा केला नाही. उलट पूर्वीचे नाव अंजली नावाने हॉस्पिटल सुरू असल्याचे आढळून आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता हॉस्पिटलची वीज जनरेटरवर वीज सुरू असल्याचे दर्शविण्यात आले. सलग पंधरा दिवस पाळत ठेवल्यानंतर हॉस्पिटलची बनवाबनवी उघडकीस आली. महावितरणरचे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये तपासणीला आले की, जनरेटरचा वापर व इतर वेळी विजेचा चोरटा वापर होत असल्याचे संयुक्त कारवाईत उघड झाले. तर एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत हॉस्पिटलने तीन लाख ५८ हजार ३०० रुपये किंमतीच्या ११ हजार ५ युनिट विजेचा चोरटा केल्याचे निष्पन्न झाले. चोरीच्या विजेचे ३ लाख ५८ हजार व एक लाख ४५ हजार रुपये दंड भरण्याची नोटिस हॉस्पिटलला बजावण्यात आली आहे.

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल व अधीक्षक अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व उपविभाग एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते व अमोल उके, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजवणी अधिकारी अतुल ओहळ, सहाय्यक अभियंता किरण इमाळी  यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkalyanकल्याण