शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जगभ्रमंती केल्यासारखे ते वारंवार पक्षांतर करताहेत! अंबरनाथमधील तिढ्यावरून कोर्टाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 07:58 IST

भाजप व शिंदेसेनेच्या सत्तासंघर्षामुळे सभापती आणि समित्यांची निवड लांबणीवर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंबरनाथ नगर परिषदेतील राष्ट्रवादी (अजित पवार)च्या सदस्यांनी वारंवार पक्षांतर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांची तुलना ‘जगभ्रमंती’ करणाऱ्यांशी केली. तसेच, नगर परिषदेत आघाड्यांना मान्यता देणे व ती काढून घेण्याबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. परिणामी, भाजप व शिंदेसेनेच्या सत्तासंघर्षामुळे सभापती आणि समित्यांची निवड लांबणीवर पडली.

न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा वाद पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना या सर्व संबंधित पक्षांना सुनावणीची संधी देण्याचे निर्देश दिले. आज हे चार जण (राष्ट्रवादी अजित पवारचे सदस्य) त्यांच्यासोबत (एकनाथ शिंदे) आहेत. काल ते कुणा दुसऱ्यासोबत होते. ते जणू जगभ्रमंतीच करत आहेत. उद्या ते आणखी कुणाकडे गेले तर?, अशी उपरोधिक टिप्पणी न्या. घुगे यांनी सुनावणीदरम्यान केली.

२० डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी  प्रतिस्पर्धी काँग्रेससोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन करीत सत्तास्थापनेचे प्रयत्न केले. यामध्ये भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) सहभागी होता. मात्र, निवडणुकांत सर्वाधिक जागा जिंकलेल्या शिंदेसेनेला या आघाडीतून बाजूला ठेवण्यात आले.

आतापर्यंत काय घडले?

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जानेवारी रोजी ‘अंबरनाथ विकास आघाडी’ला निवडणूकपूर्व आघाडी म्हणून मान्यता दिली होती. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या  निवडून आलेल्या सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादीच्या (अजित पवार) चार नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी शिंदेसेना - राष्ट्रवादी (अजित पवार) युतीला ‘निवडणूकपूर्व आघाडी’ म्हणून मान्यता देत, ‘अंबरनाथ विकास आघाडी’ची मान्यता रद्द केली. या निर्णयाविरोधात अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली.

काय म्हणाले न्यायालय?

न्यायालयाने सर्व संबंधित पक्षांना २८ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले असून, त्यानंतर २१ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय द्यावा, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांचा  आदेश पारित झाल्यानंतर तो दोन आठवड्यांसाठी अंमलात आणला जाणार नाही, जेणेकरून संबंधित पक्षांना न्यायालयात दाद मागता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.७ आणि ९ जानेवारी रोजीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना स्थगिती देत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

English
हिंदी सारांश
Web Title : Court Slams Ambernath Politicians' Frequent Party Switching as 'Globetrotting'

Web Summary : Bombay High Court likened Ambernath politicians' frequent party changes to 'globetrotting.' Court stayed Thane collector's order on alliances, impacting committee elections. Court directed fresh hearing involving BJP, Congress, NCP (Ajit Pawar), and Shinde Sena, allowing parties to present arguments before a final decision.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ambernathअंबरनाथHigh Courtउच्च न्यायालय