शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृतीची लाट येईल...; ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केला विश्वास 

By अनिकेत घमंडी | Updated: January 21, 2023 05:12 IST

पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या वतीने डोंबिवलीमध्ये पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली : वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे अशी ओरड होत असते. मात्र या कार्यक्रमामुळे या वाक्याला छेद मिळाला असून या कार्यक्रमामुळे वाचन संस्कृतीला चांगलाच वाव मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे पूर्ण महाराष्ट्रात वाचन संस्कृतीची एक लाट येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली येथे व्यक्त केले.  

पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या वतीने डोंबिवलीमध्ये पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवसीय सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले, उदय निरगुडकर, लेखिका उमा कुलकर्णी, विशाल सोनी, पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गोडबोले यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले, फारच कल्पक असा हा कार्यक्रम आहे. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. पुस्तक वाचली जात नाहीत अशी ओरड कायम सुरू असते. मात्र या वाक्याना पै फ्रेंड्स लायब्ररीने पूर्ण छेद दिला आहे. इतका भव्य कार्यक्रम अनेक वर्षात मी बघितला नव्हता असे ते म्हणाले. मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा साठा आज मी येथे पाहिला असे सांगत पुस्तक लायब्ररी ऑनलाईन सुरू करणे आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवणे हे कठीण काम आहे आणि त्याहून कठीण  आदान प्रदान सारखे कार्यक्रम घेणे हे आहे असे ते म्हणाले. मात्र पै हे खूप मोठे कार्य करत आहेत. त्यामुळे पुस्तक वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  मला या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय उत्साह वाटला. अशा कार्यक्रमांमुळे सगळीकडे पुस्तक वाचनाची एक लाट येईल असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी यावेळी केले. डॉ. उमा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या, बहू भाषिक पुस्तकांचे हे आदान प्रदान आहे. या कार्यक्रमास त्या त्या भाषेतील लेखकांना बोलावून एक चर्चा सत्र ठेवावे असा सल्ला त्यांनी यावेळी आयोजकांना दिला.