शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आगामी काळात कोणत्याही सणावर निर्बंध नाही, CM पुत्राने दिलं आश्वासन

By मुरलीधर भवार | Updated: August 28, 2022 21:11 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरीता 350 बसेस कल्याण डोंबिवलीतून रवाना. मोफत बस प्रवासामुळे चारमान्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

कल्याण - कोरोना काळातील र्निबधामुळे कोकणात गणपती उत्सवास मुंबईतील चाकरमान्यांना जाता आले नाही. या आधीचे सरकार हिंदूच्या सणावर र्निबध लादत होते. मात्र काही सण साजरे करण्यास मुभा देत होते. आत्ता शिंदे सरकारने सगळ्या सणांवरील र्निबद उठवले आहे. त्यामुळे दहीहंडीचा उत्सव जोरात साजरा जाला.  येणा:या काळात गणपती असो किंवा नवरात्र, दिवाळी  सणासह शिवजयंती जोरात साजरी केली जाईल. कोणत्याही सणावर र्निबध लादले जाणार नाही अशी ग्वाही कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. 

कल्याण लोकसभा मतदार संघात राहणाऱ्या कोकणवासियांनी गणेशोत्सव सणाला कोकणात जाता यावे करीता मोफत बस सेवा खासदार शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली. कल्याण, डोंबिवली, दिवा, कल्याण ग्रामीण याभागातील चाकरमान्यांकरीता 350 बसेस सोडण्यात आल्या. कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयापासून कल्याण मालवण या पहिल्या बसला खासदार शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून बस गाडी मार्गस्थ केली. याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे प्रशांत काळे, निलेश शिंदे, रवी पाटील,  विशाल पावशे, अरुण आशाण, माधूरी काळे आदी मान्यवर उपस्थीत होते. 

कोकणात प्रवाशांना नेणाऱ्या बस गाडी चालकाना खासदार शिंदे यांनी आवाहन केले की, बस योग्य प्रकारे चालवून प्रवाशांना इच्छीत स्थळी पोहचविण्याची काळजी घ्या. मागच्या वर्षीही कल्याण डोंबिवलीतून मोफत बस गाडय़ा सोडल्या होत्या. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी जास्तीच्या बस गाडय़ा सोडल्या आहे. चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे आधीच कोरोनामुळे मोडले आहे. त्यांना कोकणात मोफत जाता यावा यासाटी त्यांच्याकरीता मोफत बस गाडय़ा उपलब्ध करुन दिल्या. त्यांचा प्रवास मोफत होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले होते. रांगेत लावलेल्या बसेसच्या ठिकाणी चाकरमान्यांनी एकच गर्दी केली होती. कोकणासह सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील गणेश भक्तांना गणोशोत्सव साजरा करण्यासाठी मोफत बस गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदेdombivaliडोंबिवलीGanpati Festivalगणेशोत्सव