शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

...तर फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करू; आयुक्त दांगडेंची मनसेला ग्वाही

By प्रशांत माने | Updated: April 12, 2023 17:22 IST

फेरीवाला अतिक्रमणा विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र गेले १६ दिवस पहायला मिळत आहे.

डोंबिवलीः  रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात होणा-या फेरीवाला  अतिक्रमणाविरोधात मनसेने घेतलेली आक्रमक भुमिका पाहता यापुढे मनाई केलेल्या परिक्षेत्रात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील अशी ग्वाही केडीएमसीचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी मनसेचेडोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांना बुधवारी पार पडलेल्या बैठकीत दिली. '

फेरीवाला अतिक्रमणा विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र गेले १६ दिवस पहायला मिळत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी १३ मार्चला केडीएमसीला १५ दिवसांची डेडलाईन देत फेरीवाला अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. डेडलाईन संपताच स्वतः आमदार पाटील यांनी शहर अध्यक्ष मनोज घरत आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह २८ मार्चला रस्त्यावर उतरत स्थानक परिसराची पाहणी केली होती. दरम्यान मनसेच्या आक्रमक भुमिकेनंतर आजतागायत संबंधित परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण झालेले नाही. सोमवारी पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष घरत यांनी मीटर रिक्षा स्टँड उभारण्याबाबत अधिका-यांसमवेत केलेल्या पाहणी दरम्यान फेरीवाल्यांनी आक्रमक होत घरत यांना आमच्यावर उपासमारीची वेळ का आणली असा संतप्त सवाल केला होता. त्यावर आम्ही तुमच्या विरोधात नाहीत तुमच्या पुनर्वसना संदर्भात आयुक्तांशी चर्चा झाली आहे पण १५० मीटर परिक्षेत्रात अतिक्रमण करण्यास आमचा विरोध कायम असल्याचे घरत यांनी संबंधित फेरीवाल्यांना सुनावले होते.

दरम्यान आज  घरत यांची आयुक्त दांगडे यांच्याबरोबर मनपा मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केलेल्या १५० मीटर परिक्षेत्रात पांढरे पट्टे मारणे, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी शहर फेरीवाला समिती ची तातडीने बैठक लावणे, ग प्रभाग क्षेत्रातील फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाला पुरेसा कर्मचारी वर्ग पुरविणे आदिंवर चर्चा झाली. फेरीवाला अतिक्रमण हटविण्यात सातत्य राहीले पाहिजे आणि ती कारवाई प्रभावीपणे सुरु ठेवली आहे याबाबत घरत यांनी आयुक्त दांगडे यांचे आभार मानले. जर मनाई केलेल्या क्षेत्रात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी ग्वाही दांगडे यांनी घरत यांना दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसे