शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

ठाणे स्थानकातील फलाट ५ च्या रूंदीमुळे १ लाख प्रवाशांना होईल लाभ, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी केली कामाची पाहणी

By अनिकेत घमंडी | Updated: June 1, 2024 14:05 IST

रेल्वेने ठरवल्यानुसार काम सुरू असून रूळ स्थलांतर आणि फलाट रूंदीचे काम करण्यात आले असून रात्रभरात कामाचा वेग वाढला होता. रेल्वे रुळात उतरून अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.

डोंबिवली: ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५/६ रूंदीकरणाचा फायदा एक लाख प्रवाशांना होणार असून सध्या अरुंद फलाटामुळे प्रवाशांची होणारी घुसमट, प्रचंड गर्दी विभागली जाईल आणि त्यातून सुटसुटीत प्रवास करता येईल असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार।गोयल यांनी शनिवारी ठाणे स्थानकातील फलाट ५/६ च्या कामाची पाहणी केली.रेल्वेने ठरवल्यानुसार काम सुरू असून रूळ स्थलांतर आणि फलाट रूंदीचे काम करण्यात आले असून रात्रभरात कामाचा वेग वाढला होता. रेल्वे रुळात उतरून अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.त्या सोबतच फलाटातील एस्कलेटर सुविधा आणि पादचारी पुलाच्या पायऱ्यांची रूंदी करता येईल, जेणेकरून सध्या त्या ठिकाणी भेडसावत असलेली चेंगराचेंगरी काही प्रमाणात कमी करता येईल असेही जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी  स्पष्ट केले.शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवारी संध्याकाळी ४ पर्यन्त सुरू असलेल्या या ब्लॉकमध्ये पोकलेन आणि अन्य यंत्रणेच्या सहाय्याने रेल्वे रूळ स्लीपर्ससकट हलवण्याचे काम सुरू आहे, त्यानंतर मोठे आरसीसी ब्लॉक टाकून फलाटाची रूंदी वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी तीन सत्रात काम सुरू असून सुमारे २५० कर्मचारी कार्यरत आहेत, २५ अधिकारी त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पोकलेनच्या सहाय्याने विशिष्ट असे रेल्वे ट्रॅक स्लीपर्स सकट हलवण्यात येत आहेत. शनिवारी रात्री ड्रोनच्या सहाय्याने त्याचे फुटेज व्हायरल झाले होते. पोकलेन कशा पद्धतीने रूळ स्लीपर्स एका ठिकाणाहून काढुन एका लाईनमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे ते दाखवण्यात आले.तीन मीटरने फलाट रुंद होईल त्यानुसार संपूर्ण फलाट हा सुमारे ७५० मीटर रुंद होईल त्यानुसार वाढलेल्या जागेचा फायदा सुमारे लाखभर प्रवाशांना होईल ही त्या कामाची फलश्रुती असेल असे सांगण्यात आले.रूंदी वाढवायला दोन टन वजनाचे ७८५ आरसीसी बॉक्स लावण्याचे काम सुरू होते.असे होणार काम विशेष ट्रॅफिक ब्लॉकच्या सहाय्याने इन्फ्रा ग्रेड पद्धतीने काम हे शनिवारी पहाटे ६ वाजल्यापासून सुरू करण्यात आले. संध्याकाळपर्यन्त आरसीसी बॉक्स टाकून फलाट रुंद केला जाईल. त्या कालावधीत पोकलेन आणि रोलरच्या सहाय्याने अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्या।कामी १ पोकलेन आणि रोलर हे विवीध साधनसामग्री न्यू मुलुंड गुडस स्टेशनच्या सहाय्याने कामाच्या ठिकाणी पोहोचवत असल्याचे सांगण्यात आले.त्या सोबतच कामाच्या ठिकाणी रेल्वे रुळातील गॅप खडी, माती टाकुन भरण्याचे काम सुरू होते. रूळ समांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले।होते.

या आधीच गोयल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनूसार सगळ्यात वर्दळीचा असलेला फलाट ५ असून त्या ठिकाणी त्याच्या रुंदीचे काम करणे अत्यावश्यक होते. ते काम सुरू असून त्यातून पादचारी पूल, एस्कलेटर सुविधा देता येतील. त्याद्वारे प्रवाशांना अधिकाधिक त्यामुळे दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :localलोकलrailwayरेल्वेthaneठाणे