शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण न्यायालयाने दोघांना सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

By सचिन सागरे | Updated: October 4, 2022 15:10 IST

सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे यांनी त्यांना मदत केली.

सचिन सागरे

कल्याण : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत एकाला जखमी करणाऱ्या सचिन दौलत भेरे आणि विकी विष्णु भेरे (दोन्ही रा. सावरोली) या दोघांना कल्याण अतिरिक्त व सत्र न्यायालाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी सोमवारी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

१९ जानेवारी २०१८ रोजी फिर्यादी शिवाजी सातपुते (रा. सावरोली, शहापूर ) यांचा मुलगा गावाजवळील मोकळ्या जागेत विकी तसेच इतर गावातील मुले क्रिकेट खेळत होते. खेळत असताना विकीने फिर्यादी यांच्या मुलाला चापट मारली. आपल्यासोबत घडलेला प्रकार मुलगा घरी जाऊन आपल्या काकाला सांगत होता. त्याचवेळी, हातात लोखंडी सळई, लाकडी दांडक्यासह घरात घुसलेल्या विकी आणि सचिन यांनी फिर्यादी यांचा भाऊ नारायण यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. सचिनने लोखंडी सळईने तर विकीने लाकडी दांडक्याने नारायण यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले. त्यानंतर तेथून पसार झाले. याप्रकरणी शिवाजी यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. खोकराळे यांनी पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे यांनी त्यांना मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणCourtन्यायालय