शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार!

By मुरलीधर भवार | Updated: October 3, 2022 19:01 IST

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एमएमआरडीए आयुक्तांसोबत पार पडली बैठक

कल्याण: वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित असलेला कल्याण-डोंबिवली महापालिकेचा महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. रिंग रोड प्रकल्पासंदर्भात मुंबई एमएमआरडीए कार्यालयात आज बैठक पार पडली. या बैठकीस खासदार शिंदे यांच्यासह एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. श्रीनिवास आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाकरिता ८३ टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. डोंबिवली मोठा गाव ते कल्याण दुर्गाडी हा तिसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. रिंगरोडच्या टप्पा चार ते सातमधील अडथळे दूर करुन त्या कामाला गती दिली जाणार आहे. भूसंपादन पूर्ण करण्यासाठी बीएसयूपी योजनेतील घरांचे वाटप बाधितांना केले जील. टप्पा चार ते सातचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पार करता येणार आहे. टप्पा सात नंतर टिटवाळा ते रुंदे येथील रस्ता पुढे टप्पा आठ थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडला जाणार आहे. कल्याण तळोजा मेट्रो मार्ग १२ ला गती देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक झाली आहे. त्याची निविदा काढून कामाला सुरुवात केली जाईल.

शहाड येथील अरुंद पूलाच्या रुंदीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हा पूल १० मीटरचा असून ३० मीटरच्या करण्यासाठी तत्वत: मंजूरी दिली गेली आहे. विठ्ठलवाडी ते शहाड या उन्नत पूलाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे वेळ खाऊ प्रवासातून मुक्तता होणार आहे. डोंबिवली माणकोली पूलाचे काम पूर्ण करुन हा मार्ग एप्रिल २०२३ पर्यंत वाहतूकीसाठी खुला केला जाईल. त्यामुळे डोंबिवली ठाणे हे अंतर पंधरा मिनिटात पार करता येणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे