शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

By मुरलीधर भवार | Updated: May 21, 2024 14:23 IST

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते.

कल्याण : मागील लोकसभा निवडणुकीत ४८.०५ टक्के मतदान झाल्याने देशात दुसऱ्या क्रमांकाचे कमी मतदान करणारा मतदारसंघ असा ‘विक्रम’ येथील मतदारांनी नोंदवला होता. यावेळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कल्याण मतदारसंघात ४१.७० टक्के मतदान झाले असल्याने मागील निवडणुकीपेक्षा कमी मतदान करून मतदानात पिछाडीवर राहण्याचा ‘विक्रम’ पुन्हा येथील मतदार नोंदवणार आहेत. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होणे, अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मतदानामुळे मतदान केंद्रांवर तासनतास तिष्ठत राहावे लागणे, या निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराने मतदारांच्या निरुत्साहात भर घातल्यानेच कल्याण मतदारसंघात कमीतकमी मतदान झाले.

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते. मात्र, मागील दोन-तीन निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर येथील सुशिक्षित मतदार मतदानाबाबत अतिशय निरुत्साही आहेत. अनेक मतदार सुट्टी लागल्याने बाहेर निघून जातात. सोमवारी सकाळपासून कल्याणमधील काही भागात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. मात्र, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली येथील अनेक भागातील मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर शेकडो मतदारांनी जाऊन तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते. डोंबिवलीत ज्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांकडे निवडणूक आयोगाची जुनी ओळखपत्रे आहेत, त्यांची एका विशिष्ट सिरीजमधील नावे यादीतून गायब असल्याचे स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितले. याबाबत निवडणूक विभाग समाधानकारक स्पष्टीकरण देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळा, घामाच्या धारा, तीन तासांची प्रतीक्षाप्रचंड उन्हाळा, घामाच्या धारा आणि मतदान केंद्रांवर किमान दोन ते तीन तासांची प्रतीक्षा अशा परिस्थितीमुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रांवर जात होते. परंतु, येथे आपल्याला मतदानाला दीर्घकाळ लागेल हे लक्षात येताच तेथून माघारी जात होते. ८४ वर्षांच्या आजींना केले मृत घोषितउल्हासनगरातील सुभाष टेकडी येथील सुमित्रा टाले या ८४ वर्षीय आजींना निवडणूक यंत्रणेने मृत घोषित केले होते. त्या मतदानाला गेल्या तेव्हा ही नोंद पाहून त्यांना धक्का बसला. आपण जिवंत असून मतदान केल्याखेरीज जाणार नाही, असा पवित्रा टाले यांनी घेतल्याने निवडणूक विभागाने त्यांना मतदान करू दिले.पोई आदिवासी गावाचा बहिष्कारपोई या आदिवासी पाड्याला रस्त्याने जोडण्यात न आल्याने या आदिवासी पाड्यावरील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान