शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मित्रावर गोळी झाडणाऱ्याला अवघ्या २४ तासांत अटक, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

By मुरलीधर भवार | Updated: October 5, 2023 17:07 IST

गोळी झाडणाऱ्यास कल्याण गुन्हे अन्वषेण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे. 

कल्याण-कल्याणनजीकच्या मोहने आंबिवली परिसरातील बंदरपाडा भागात चार मित्राची दारु पार्टी सुरु होती. या वेळी एका मित्राने सुशिलकुमार महंतो याच्यावर गोळी झाली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळी झाडणाऱ्यास कल्याण गुन्हे अन्वषेण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमेश प्रमोद खानविलकर असे आहे. जुन्या वादातून त्याने सुशिलवर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्यामध्ये वाद काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

बंदरपाडा परिसरात सोमनाथ म्हात्रे या व्यक्तीच्या घरात चार मित्र जमा झाले. हे चौघे पार्टीसाठी जमा झाले होते. पार्टी सुरु असताना उमेश खानविलकर नावाच्या तरुणाने मजामस्तीत बंदूकीतून त्याचा मित्र सुशिलकुमार महंतो यांच्या दिशेने गोळी झाली. त्यावेळी सुशीलकुमार याने हात आडवा केला. तेव्हा झाडलेली गोळी त्याच्या हाताच्या पंजाला भेदून त्याच्या तोंडात गेली. गोळीने त्याची जीभ फाडली. त्याच्या घशात ही गोळी अडकल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

गोळीबार करुन उमेश खानविलकर हा पसार झाला होता. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाट यांच्या यांच्या पथकाने उमेश खानविलकरला शहाड रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. उमेश हा लोकल ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले. उमेशने ज्या बंदूकीती गोळी झाडली. ती बंदूक त्याला त्याच्या मित्रानेच दिली अशी माहिती त्याने पोलिसांना सांगितली आहे. मात्र त्याने ही बंदूक नक्की कोणाकडून घेतली. त्याला कोणी दिली. याचा तपासही खडकपाडा पोलिसांकडून केला जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण