शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गहाळ झालेले मंगळसूत्र रामनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

By प्रशांत माने | Updated: January 2, 2024 18:54 IST

तक्रार दाखल होताच अवघ्या तासाभरात दिले शोधून

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: रिक्षामधून प्रवास करताना एका महिलेचे गहाळ झालेले १५ ग्रॅम वजनाचे ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र रामनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तासाभरात शोधून दिले. मंगळसूत्र सापडताच संबंधित महिलेचा जीव भांडयात पडला.

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राहणा-या निमिषा बांधवलकर या सोमवारी सकाळी ९.३० ते ९.४५ या कालावधीत पती निलेश यांच्या समवेत नांदिवली ते डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान प्रवास करताना त्यांच्या गळयातील मंगळसूत्र गहाळ झाले. मंगळसूत्र कुठेतरी गहाळ झाल्याचे निमिषा यांना दुपारी १२ च्या सुमारास समजले. त्यांनी लागलीच याबाबतची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात केली.

तक्रार दाखल होताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार प्रशांत सरनाईक, पोलिस शिपाई नितीन सांगळे, देविदास पोटे यांनी तपासाला सुरूवात केली. त्यांनी ज्या रिक्षातून बांधवलकर दाम्पत्य प्रवास करीत होते. त्या रिक्षाचा सीसीटिव्हीच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला आणि रिक्षात पडलेले मंगळसूत्र रिक्षाचालकाकडून हस्तगत केले आणि निमिषा यांचे पती निलेश यांच्याकडे ते सुपूर्द केले. तक्रार दाखल होताच हरवलेले मंगळसूत्र तासाभरात मिळवून दिल्याबाबत सानप आणि त्यांच्या पथकाचे बांधवलकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Policeपोलिसdombivaliडोंबिवली