शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारे सराईत चोरटे गजाआड

By प्रशांत माने | Updated: April 17, 2023 16:52 IST

चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डोंबिवलीः  पूर्वेकडील रेल्वे स्थानक  परिसरातील रामनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री प्रिया मोबाईल या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी  लाखो रुपये किमतीचे ३३ मोबाईल चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. दरम्यान या गुन्हयातील दोघा आरोपींना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोबाईल चोरीप्रकरणी सुंदरम विश्वनाथ  गवंडर यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिस ठाण्याच्या नजीक घडलेली ही घरफोडीची घटना चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान या गुन्हयाच्या तपासकामी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, पोलिस उपनिरीक्षक केशव हासगुळे, विजय कांबळे, पोलिस हवालदार सुनिल भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, विशाल वाघ , पोलिस नाईक हनमंत कोळेकर, पोलिस शिपाई शिवाजी राठोड, राहुल ठाकूर यांचे पथक गठीत केले गेले होते. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे १२ तासाच्या आत दोघा चोरट्यांना अटक केली.

फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान ( वय २५) आणि सागर श्याम पारखे ( वय २३) दोघे राहणार देसलेपाडा, डोंबिवली पूर्व अशी अटक आरोपींची नावे आहेत. संबंधित आरोपी मुंबईतील अट्टल गुन्हेगार आहेत. तेथील विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींपैकी फिरोज हा मुंबईतील गुन्हयात फरार होता तर सागर हा तडीपार होता.नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे

ज्या ठिकाणी ही चोरी झाली तेथील  इमारतीच्या सुरक्षारक्षकाने ही चोरी होताना पाहिले होते. त्याने आरडाओरडा केला असता तर घरफोडी झालीच नसती किंवा  रस्त्यावरील लोक अथवा रात्रपाळीत व्यवसाय करणारे रिक्षा चालक मदतीला धावले असते आणि चोर पकडले गेले असते परंतु चोरटे हल्ला करतील या भीतीने त्याने शांत राहणे पसंत केले अशीही माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान अशा घटनांच्या वेळी प्रसंगानुरूप नागरिकांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.