शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

यांचे नक्की प्रेम कोणावर? अंबरनाथ पालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकाेर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 06:29 IST

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचे उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई : अंबरनाथ नगरपालिकेच्या सभापती निवड व सहा समित्यांची निवड करण्यासाठी सोमवारी भरवण्यात येणारी सभा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शनिवारी दिले.शिंदेसेनेने स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला  अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एका अपक्षाने मिळून स्थापन केलेल्या अंबरनाथ विकास आघाडीला डच्चू देत राष्ट्रवादी (अजित पवार)ने शिंदेसेनेशी हातमिळवणी करत आधी भाजपबरोबर केलेली आघाडी तोडण्यात यावी, यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. भाजपबरोबर आघाडी स्थापन करण्यासाठी दिलेली प्रतिज्ञापत्रे मागे घेऊन तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (अजित पवार)  पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य करत ९ जानेवारी रोजी शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि अपक्षांची मिळून तयार करण्यात आलेल्या गटाला मान्यता दिली. या निर्णयाविरोधात भाजपच्या नेतृत्वाखालील अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. 

राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नगरसेवकांनी आघाडीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच दुसऱ्या गटाशी हातमिळवणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही ती प्रक्रिया पार पाडण्यात आली की नाही, याची छाननी न करता आधीची आघाडी रद्द केली आणि नव्या गटाला परवानगी दिली. कायद्याने, जिल्हाधिकारी आधीचा आघाडी स्थापण्याचा निर्णय मागे घेऊ शकत नाही, असे याचिकेत म्हटले. या निर्देशानंतर नगरपालिकेत कोणत्या घडमोडी घडतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

समित्यांच्या सभेसाठी भरणार होती सभा

सोमवारी सभापती निवड आणि पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, महिला व बाल कल्याण, नियोजन आणि शिक्षण समिती आदींची स्थापना करण्यासाठी भरविण्यात येणारी सभा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करा, असे निर्देश न्यायालयाने नगरपालिकेला दिले.

यांचे नक्की प्रेम कोणावर?

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य असल्याने नव्या गटाला अवैध ठरवावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ‘हे चार जण (राष्ट्रवादी (अजित पवार)चे नगरसेवक) अशाप्रकारे संपूर्ण लोकशाही यंत्रणेला वेठीस धरू शकत नाही. आज याच्यावर प्रेम, उद्या त्याच्यावर प्रेम...यांचे नक्की कोणावर प्रेम आहे आणि ते किती काळ टिकणार? हे सांगता येणार नाही,’ असे न्यायालयाने उपहासाने म्हटले. 

हा प्रश्न न्यायालयाने सोडवावा की आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू? आमच्याकडे आला तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू त्यासाठी काही काळ लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी सारासार विचार करून पुन्हा निर्णय घ्यावा, असे वाटत असेल तर त्यांच्याकडे पुन्हा हे प्रकरण पाठवू. याबाबत दोन्ही पक्षांनी निर्णय घ्या आणि सोमवारी माहिती द्या,’ असे निर्देश न्यायालयाने शिंदेसेना व भाजपला दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambernath Municipality Meeting Adjourned: Court Questions Political Alliances in Ambernath.

Web Summary : High Court adjourned Ambernath Municipality meeting amid dispute over political alliances. Court questions shifting loyalties of Nationalist Congress Party (Ajit Pawar faction) and directed parties to reconsider alliances.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६ambernathअंबरनाथCourtन्यायालय