शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालिश बहु बायकांत बडबडला; भाजपचा शिवसेना शहर प्रमुखांवर पलटवार

By मुरलीधर भवार | Updated: September 18, 2023 19:12 IST

कल्याण-कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या टिकेला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले. शहर प्रमुख ...

कल्याण-कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या टिकेला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले. शहर प्रमुख हे काही तरी कागद घेऊन येतात. चार कागद आणले तर तो पुरावा होत नाही. त्यांची ही बडबड केवळ बातम्यांमध्ये राहणे हा त्यांचा केवीलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे बालिश बहु बायकांत बडबडला असा प्रकार आहे अशी खरमरीत टिका भाजप पदाधिकारी संदीप तांबे यांनी केली आहे. 

कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख गायकवाड याच्यातील वाद संपायचे नावच घेत नाही. आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाकडून भाजपचा छळ सुरु असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे तर माझ्याकडे रॉकेट असल्याचे म्हटले होते. त्या पश्चात शहर प्रमुख गायकवाड यांनी त्यांनी धनुष्यबाणाचे नाव घेऊ नये. रॉकेट जतना कोणत्या ठिकाणी घालेल सांगता येणार नाही असे प्रतिउत्तर दिले होते. यासोबतच भ्रष्टाचार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबद्दल देखील विधान केले होते. शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी दिलेल्या प्रतिउत्तरानंतर पुन्हा भाजपचे पदाधिकारी तांबे यांनी महेश गायकवाड यांच्यावर पलटवार केला आहे. तांबे यांनी सांगितले की, विना पूराव्याचे आरोप करायचे. चार कागद दाखविले म्हणजे पुरावे होत नाही. ज्या कामाविषयी ते आरोप करीत आहे. ते काम ३० गाव येथे नाही. माजी नगरसेवक गायकवाड यांना ते काम नक्की कुठे आहे हेच माहिती नाही. त्याठिकाणी वि्ठठल रुक्मीणीचे शिल्प आहे. त्याचबरोबर स्वानंद अध्यात्मीक मंडळ आहे. त्याठिकामी वारकरी येतात. त्यासाठी बाकडे ठेवले आहे. या कामाचे बिल अद्याप निघालेले नाही कामही पूर्ण झालेले नाही. त्याबद्दल त्यांनी माहिती घेऊन बाेलावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे तीन वेळा उद्घाटन झालेलेच नाही. त्या स्मारकाच्या जागेचे हस्तांतर करण्यापासून सर्व परवानग्या आणण्याचे काम आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. उगास बडबड करुन बातम्यांमध्ये राहणे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे बालिश बहु बायकांत बडबडला असा आहे.

टॅग्स :BJPभाजपा