शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जेमतेम ५०० ग्रॅमचे बाळ, ३ महिन्यांत गुटगुटीत करून धाडले सुखरूप घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 09:44 IST

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांची किमया

सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात ममता निकम या महिलेची कमी दिवसांत प्रसूती होऊन ५०० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला होता. डॉक्टर व नर्सनी नवजात शिशुकक्षात बाळावर तीन महिने यशस्वी उपचार करून बुधवारी बाळाला रुग्णालयातून सुटी दिली. आता बाळाचे वजन दोन किलो असून तब्येत सुदृढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली. 

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली. सहा महिन्यांची गर्भवती असणाऱ्या ममता हिने उपचारादरम्यान कमी दिवसांच्या बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे वजन अवघे ५०० ग्रॅम असल्याने, कमी वजनाच्या बाळाच्या तब्येतीबाबत कुटुंबासह डॉक्टर्स व नर्स यांच्या समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र, आईला मुलाविषयी असलेले प्रेम व लळा बघून नवजात शिशू कक्षातील डॉ. वसंतराव मोरे, डॉ. वैशाली पवार, डॉ. किरण बनसोडे, डॉ. आझम खान, डॉ. पूजा यादव, नर्स जयश्री शिंदे, गौरी केलसीकर आदींनी सतत तीन महिने या बाळाला तळहातावरील फोडासारखे जपले. जणू या बाळाचा पुनर्जन्म झाला. उपचारादरम्यान बाळाच्या डोळ्याला संसर्ग झाल्याने, त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

आईच्या जिद्दीला सलामममता निकम या महिलेची सहाव्या महिन्यात प्रसूती होऊन अवघ्या ५०० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिल्याने, तिच्या कुटुंबाने बाळाच्या जगण्याची आशा सोडली होती. मात्र, ममता यांनी जिद्द सोडली नाही. आईच्या जिद्दीला डॉक्टर व नर्सनी सलाम ठोकून उपचार केले.

असुविधांवर मातमध्यवर्ती रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाची क्षमता १० बालकांची असून व्हेंटिलेटरची सुविधा नाही. अशा अपुऱ्या सुविधांवर मात करीत डॉक्टरांनी बाळाची प्रकृती ठणठणीत करून घरी सुखरूप पाठविले आहे.

कक्षाची क्षमता १०, पण...

मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी  येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून वर्षाला सहा हजारांपेक्षा जास्त बाळांचा जन्म होतो. २०२ बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. नवजात शिशू कक्षाची क्षमता १० बालकांची असताना सरासरी १५ पेक्षा जास्त मुलांवर उपचार होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरhospitalहॉस्पिटल