शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील डांबर उखडून गेले वाहून; नालंबी मार्गाची दोन वर्षांत दुरुस्ती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 06:37 IST

टँकर, सिमेंट रेडिमिक्स वाहनामुळे मोठ्या अपघाताची भीती

पंकज पाटीलअंबरनाथ : तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे, या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून उल्हास नदीतून बेकायदा पाणी भरून जाणारे टँकर तसेच सिमेंट प्लांटमधून रेडिमिक्स काँक्रिटची वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

ग्रामीण भागातील नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी या रस्त्याने जोडली गेली आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ अंबरनाथ शहरात येत असतात. आधी हा रस्ता सुस्थितीत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. २०२१ मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभरदेखील हा रस्ता टिकला नाही. पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला. संबंधित ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. काम निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच खड्डे पडले. 

यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला. अंबरनाथच्या कोहजगावपासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला.अंबरनाथहून टिटवाळ्याकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात.

उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरात पुरवठा करीत आहेत. त्यामुळे बेकायदा चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

कल्याण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांटमधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्स काँक्रिटच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.

टॅग्स :ambernathअंबरनाथroad safetyरस्ते सुरक्षा